एक्स्प्लोर
उद्धव ठाकरेंवर टीका, रोहित पवारांची फेसबुक पोस्ट
"अजित पवार या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही. काकांच्या पुण्याईने व कृपेनेच ते तरले आहेत. हे महाशय अधूनमधून शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळी परिस्थिती यावर त्यांच्या 'मुतऱ्या' थोबाडाने बोलत असतात," अशा शब्दात 'सामना'च्या अग्रलेखात टीका केली होती.
मुंबई : 'सामना'च्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. "आमच्या उद्धवला सांभाळा, असं बाळासाहेब ठाकरे अखेरच्या क्षणी का म्हणाले होते याचा अर्थ आता समजला. संपादकीय लिहिण्याऐवजी दोन ओळीचा राजीनामा लिहिला असता वडिलांप्रमाणे आपल्याला ताठ कणा आहे हे महाराष्ट्राला पाहायला मिळालं असतं,"असं रोहित पवार म्हणाले.
'सामना'तून अजित पवारांवर टीका
मागील बुधवारी (24 ऑक्टोबर) जालन्यातील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी अयोध्येत राममंदिर उभारण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेवरुन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. "पाच वर्षांमध्ये बापाचं स्मारक बांधता आलं नाही ते राम मंदिर काय बांधणार?," असा खोचक सवाल अजित पवार यांनी केला होता. उद्धव ठाकरेंनी या विधानाचा 'सामना'च्या अग्रलेखातून समाचार घेतला.
"अजित पवार या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही. काकांच्या पुण्याईने व कृपेनेच ते तरले आहेत. हे महाशय अधूनमधून शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळी परिस्थिती यावर त्यांच्या 'मुतऱ्या' थोबाडाने बोलत असतात," अशा शब्दात 'सामना'च्या अग्रलेखात टीका केली होती.
रोहित पवारांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
यानंतर रोहित पवार यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. ते म्हणतात, "बाळासाहेब अखेरच्या क्षणी म्हणाले होते, आमच्या उद्धवला सांभाळा! त्या सांभाळाचा अर्थ काल समजला, त्याचा अर्थ आमचा मुलगा अल्लड आहे त्याला सांभाळून घ्या असाच असावा. बाळासाहेब हुशार होते, भाषेवर प्रभुत्व असणारे मोठ्ठे नेते होते. मार्मिक असो कि सामना त्यांनी टिका देखील जहाल केली, पण त्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी गरळ ओकून त्यांच्याच लेखणीचा अपमान केला. उद्धव ठाकरे कधी लोकांच्यातून निवडून आले नाहीत की मातोश्रीच्या बाहेर पडून उभा महाराष्ट्र पाहण्याचं देखील साधं कष्ट घेतलं नाही. महाराष्ट्र जळत असताना हे महाशय सत्तेत भागीदार होवून सर्वसामान्यांना भुलवण्याचं काम करत आहेत.
इतका लेख लिहण्याच्या ऐवजी दोन ओळींचा राजीनामा दिला असता तरी आपल्या वडिलांप्रमाणे आपला ताठ कणा महाराष्ट्राला पहायला मिळाला असता."
कोण आहेत रोहित पवार?
रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुतणे राजेंद्र पवार यांचे पुत्र आहेत. शरद पवारांचे मोठे बंधू आप्पासाहेब यांचे नातू रोहित आहेत. रोहित पवार सध्या बारामती जिल्हा परिषद सदस्य आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement