एक्स्प्लोर

1 मे पासूनच्या लसीकरणाबाबतच्या शंकांचे निरसन करा, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी

येत्या 1 मे पासून लसीकरणासाठी होणारी अधिकची गर्दी ध्यानात घेऊन राज्य सरकारने जी लसीकरणासाठीची जास्तीची केंद्रे निश्चित केली आहेत, त्यांची यादी जाहीर करावी, अशी मागणी भाजपच्या केशव उपाध्ये यांनी केली.

मुंबई : देशभरात 1 मे पासून तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात होत आहे. तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. राज्यात 1 मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाबाबत जनतेच्या मनात असलेल्या शंकांचे राज्य सरकारने निरसन करावे, अशी मागणी भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. 

भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपाध्ये म्हणाले की, लसीकरणासाठी तरुणांमध्ये उत्साह आहे. 1 मे नंतर लसीकरणासाठी मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडतील, अशी अपेक्षा आहे. सध्याचे लसीकरण आणि 1 मेपासून होणारे 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पाहता प्रत्येक महानगरपालिका क्षेत्र व जिल्ह्यानुसार लसीकरण केंद्रांची आकडेवारी जाहीर करावी.

कोरोनाची लक्षण असतानाही निगेटिव्ह रिपोर्ट का येतो? असे झाल्यास काय करावे?

येत्या 1 मे पासून लसीकरणासाठी होणारी अधिकची गर्दी ध्यानात घेऊन राज्य सरकारने जी लसीकरणासाठीची जास्तीची केंद्रे निश्चित केली आहेत, त्यांची यादी जाहीर करावी. 1 मे नंतर होणाऱ्या लसीकरणासाठी आयत्या वेळी येणाऱ्या नागरिकांना वॉक इनसाठी परवानगी असेल का? की केवळ आधी ऑनलाईन नोंदणी केली असेल त्यांचंच लसीकरण केले जाईल, याबाबतही राज्य सरकारने खुलासा करणे आवश्यक आहे, असा केशव उपाध्ये यांनी म्हटलं.  

लसीकरण मोफत की सशुल्क?

तसेच लसीकरण मोफत आहे की सशुल्क आहे याबाबत आघाडी सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचे काही मंत्र्यांच्या वक्तव्यावरून दिसत आहे. त्यामुळे लसीकरण मोफत आहे की नाही याचाही खुलासा राज्य सरकारने करावा, असंही केशव उपाध्ये यांनी सांगितले.

1 मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणासाठी 28 एप्रिलपासून नोंदणी सुरू

 देशात 16 जानेवारीपासून जाहीर करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला 1 मे पासून सुरुवात होत आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. या लसीकरण मोहिमेची नोंदणी 28 एप्रिलपासून सुरू होणार आहे. केंद्र सरकारने याबाबत माहिती दिली आहे.  नोंदणी अधिकृत वेबसाइट COWIN.GOV.IN वर होईल. 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण 1 मे पासून सुरु होईल.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
Jantar Mantar Lathi Charge: आपण आता हुकूमशाहीविरोधात लढलो नाहीतर पुढची पिढी आपल्याला षंढ म्हणेल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे: संदीप देशपांडे
आपण आता हुकूमशाहीविरोधात लढलो नाहीतर पुढची पिढी आपल्याला षंढ म्हणेल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे: संदीप देशपांडे
BEST Bus Accident: 'व्हिडीओ गेमसारखी बस पळवली अन्...'; BEST अपघातातील जखमींचा टाहो; म्हणाले, 'खिशात फक्त 200 रुपये, उपचार करायचे कसे?'
'व्हिडीओ गेमसारखी बस पळवली अन्...'; BEST अपघातातील जखमींचा टाहो; म्हणाले, 'खिशात फक्त 200 रुपये, उपचार करायचे कसे?'
Chaityabhumi Protest : चैत्यभूमीवरील आंदोलनाला परवानगी नाकारली; आंदोलनकर्त्यांवर FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
चैत्यभूमीवरील आंदोलनाला परवानगी नाकारली; आंदोलनकर्त्यांवर FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
Abhijeet Dipke : जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Maharashtra Government: राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Chandrashekhar Azad Jantar Mantar Protest CJP: दिल्लीत विद्यार्थ्यांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
दिल्लीत पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
Embed widget