एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जीव गेल्यावरच मदतीची घोषणा का, रेणुका शहाणेंचा फेसबुकवरुन संताप
‘एखाद्या दुर्घटनेत कोणाचा तरी जीव गेल्यावरच किंवा मोठं नुकसान झाल्यावरच मदतीची घोषणा करणं राजकारण्यांना इतकं सोपं का झालंय,’ असा उद्विग्न सवाल त्यांनी सरकारला केला आहे.
मुंबई : अंधेरीतील गोखले ब्रिजचा फुटपाथ कोसळून पाच जण जखमी झाल्याच्या घटनेवरुन अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सरकारच्या अकार्यक्षमतेवर खरमरीत टीका केली आहे. या फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.
‘एखाद्या दुर्घटनेत कोणाचा तरी जीव गेल्यावरच किंवा मोठं नुकसान झाल्यावरच मदतीची घोषणा करणं राजकारण्यांना इतकं सोपं का झालंय,’ असा उद्विग्न सवाल त्यांनी सरकारला केला आहे. रेणुका शहाणेंच्या मते, हा करदात्यांचा पैसा असल्याने नुकसान झाल्यावरच मदत करणं राजकारण्यांना सोपा मार्ग वाटतो.
‘तुम्हाला जर असा प्रश्न पडला असेल की,‘राजकारण्यांना किंवा प्रशासनातील लोकांना ज्या कामासाठी निवडलं गेलंय त्यांना ते काम का करता येत नाही?’ तर त्याचं उत्तर सोपं आहे. सरकारने अशी कामं केली तर त्यांना पैसाही खाता येणार नाही आणि अभ्यासदौऱ्याच्या नावाखाली परदेशातही फिरायला जाता येणार नाही’, असं रेणुका शहाणेंनी म्हटलं आहे.
‘सरकारच्या अशा वागण्याला अजून एक कारण आहे, ते म्हणजे मुंबई स्पिरीटच्या नावाखाली दुसऱ्या दिवशी सगळं व्यवस्थित झालेलं असतं,’ असं म्हणत त्यांनी मुंबईकरांच्या शांत बसण्याच्या भूमिकेवर भाष्य केलं आहे.
‘जनतेने काळ्या पैशावर बोलण्याची हिंमत करु नये. कारण या देशातला सगळा काळा पैसा पांढरा झाल्याची घोषणा सरकारने केली आहेच. त्यामुळे आता कोणताही भ्रष्टाचार राहिलेला नाही’, असं उपरोधिक भाष्य करत त्यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर फेसबुक पोस्टद्वारे आसूड ओढला आहे.
अंधेरीत नेमकं काय घडलं?
अंधेरी रेल्वेस्थानकाजवळ गोखले ब्रिजच्या फुटपाथचा काही भाग सकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत पाच जण जमखी झाले आहेत. फुटपाथ थेट ओव्हरहेड वायरवर कोसळल्याने याचा रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला. पश्चिम रेल्वेची वाहतूक सकाळपासून विस्कळीत झाली आहे.
दरम्यान, एल्फिस्टन दुर्घटना घडल्यानंतर सर्व रेल्वे पुलांचे ऑडिट केले जाईल, असं सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र आता अंधेरी दुर्घटना घडल्यानंतर सरकारच्या आश्वासनाचं काय झालं, असा प्रश्न मुंबईकर विचारत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
क्रीडा
क्राईम
Advertisement