एक्स्प्लोर
पुन्हा एकत्र यायचं असल्यास शिवसेनेनं हात पुढे करावा: दानवे

मुंबई: ‘शिवसेनेनं भाजपसोबतची युती तोडली, त्यामुळं पुन्हा एकत्र यायचं असेल तर शिवसेनेनं हात पुढे करावा.’ असं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी स्पष्ट केलं आहे. दानवेंनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी 10 पैकी 6 महापालिकेत भाजपचीच सत्ता येईल असा दावाही त्यांनी केला. मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि सोलापूरमध्ये भाजपचा महापौर होईल. तर इतरही ठिकाणी भाजप किंगमेकरच्या भूमिकेत असेल. असंही दानवे म्हणाले. 'भाजप आणि शिवसेनेचे वैचारिक मतभेद नाही हे मी आधीच स्पष्ट केलेलं आहे. कटोरा घेण्याचा तर मुळीच प्रश्न येत नाही. युती तोडण्याची घोषणा भाजपनं केलेली नाही. तर युती तोडण्याची घोषणा शिवसेनेनं केलेली आहे. तर आता युती करण्यासाठी शिवसेनेनं हात पुढे करावा.' असं दानवेंनी स्पष्ट केलं. 'याशिवाय जी परिस्थिती निर्माण होईल. त्यावर भाजपमध्ये चर्चा होईल. पण भाजपला कोणाच्याही पाठिंब्याची गरज लागणार नाही. अशाप्रकारची स्थिती निर्माण होईल असा मला विश्वास आहे.' असंही दानवे म्हणाले. संबंधित बातम्या: मुंबईत 110 जागांवर विजयाचा अंदाज : शिवसेना मुंबईत मतदानावाढीचा चकवा नव्हे, मतदारांत वाढ : सहारिया मत नोंदवा : कोणत्या मनपात कोणाची सत्ता? झेडपी आणि पं समितीचा पहिल्या तासातच निकाल?
आणखी वाचा























