एक्स्प्लोर

BMC Election : मनसे-शिवसेना ठाकरेंच्या युतीचा पहिला प्रस्ताव कधी? प्रभाग रचनेचा आदेश दिल्यानंतर आतल्या गोटातील माहिती समोर

MNS Shiv Sena Alliance : महापालिका प्रभाग रचनेचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होऊन ऑक्टोबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

मुंबई : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांचे जरी मनोमिलन झालं असलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीसाठी वरिष्ठ स्तरावरून मात्र काहीच हालचाली होत नसल्याचं चित्र आहे. महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना करायला सुरुवात झाली आहे. मात्र अजूनही मनसे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेच्या युतीच्या चर्चांच्या पलीकडे पुढे गाडी जात नाही. त्यामुळेच निवडणुका जाहीर झाल्यानंतरच प्रत्यक्षात ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा पुढे जाणार का असा प्रश्न विचारला जात आहे. 

एकीकडे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना नेमकी कशी असणार या संदर्भात  तयारी पूर्ण झाल्याचं दिसतंय. त्यामुळे महापालिका निवडणुका लवकरच लागण्याची शक्यता आहे. तरीही मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल कुठलाही निर्णय किंवा अधिकृत प्रस्ताव एकमेकांत समोर आलेला नाही. 

Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance : नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे मनोमिलन

मनसेने आणि ठाकरे यांच्या शिवसेनेची आगामी महापालिका निवडणुकांसाठी युती होणार अशा चर्चा मागील दोन महिन्यापासून सुरू आहेत. दोन्ही पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्तेसुद्धा या युती संदर्भात सकारात्मक आहेत. अनेक ठिकाणी नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन झाल्याचे सुद्धा चित्र आहे.  मात्र प्रत्यक्षात दोन प्रमुख नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये युतीबाबत कुठलाही निर्णय अधिकृतपणे झालेला नाही. शिवाय तसा कुठलाही प्रस्ताव एकमेकांसमोर ठेवण्यात आलेला नाही.

BMC Election News : निवडणूक जाहीर झाल्यानंतरच चर्चा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी युती संदर्भातली पावलं पुढे टाकली जातील. दोन्ही बाजूंचे नेते जरी सकारात्मक असले तरी प्रत्यक्षात प्रस्ताव आणि चर्चा या निवडणुका जाहीर झाल्यानंतर केल्या जातील अशी माहिती आहे. त्याआधी दोन्ही पक्षांकडून आपल्या ताकदीचा आढावा विविध पातळीवर विविध शहरांमध्ये घेतला जात आहे. 

प्रभाग रचनेचा आदेश जारी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठीच्या हालचालींना वेग आला आहे. महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकानं दिलेत. अ, ब आणि क वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश देण्यात आलेत. यामध्ये पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवली या महापालिकांचा समावेश आहे. 
 
मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 एकसदस्यीय प्रभाग तर पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, नवीमुंबई, पिंपरी चिंचवड, छ. संभाजीनगर यासह इतर सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांचे प्रभाग असणार आहेत. 

ही बातमी वाचा: 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Actress Lives In 100 Year Old Bungalow: 100 वर्ष जुन्या आलिशान बंगल्यात राहते सैफ अली खानची 'ही' हिरोईन; शाहरुखच्या मन्नतपेक्षाही कित्येक पटींनी सुंदर हिचं घर!
100 वर्ष जुन्या आलिशान बंगल्यात राहते सैफची 'ही' हिरोईन; शाहरुखच्या मन्नतपेक्षाही कित्येक पटींनी सुंदर हिचं घर!
Maharashtra Live blog: बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाचा नवा दिवस, रात्रभर रस्त्यावरच झोपले
Maharashtra Live blog: बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाचा नवा दिवस, रात्रभर रस्त्यावरच झोपले
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार,  टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार, टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
Montha Cyclone Maharashtra Weather: मोंथा चक्रीवादळामुळे कोकणातील समुद्र खवळला, उरणमधील बोट समुद्रात भरकटली, 50 खलाशांशी संपर्क तुटला
मोंथा चक्रीवादळामुळे कोकणातील समुद्र खवळला, उरणची बोट समुद्रात भरकटली, 50 खलाशांशी संपर्क तुटला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mission BMC: ठाकरे गटाचा नवा डाव, 'नवीन चेहऱ्यांना उमेदवारीसाठी प्राधान्य' देत जुन्यांना धक्का?
Maha Local Polls: 'जिथं जुळणार नाही, तिथं मैत्रीपूर्ण लढत', Eknath Shinde यांचे संकेत
Sillod Voter List Fraud : सिल्लोडमध्ये मतदार यादीत घोळ? बंद घरात तब्बल ५१० मतदार
Bachchu Kadu Morcha: 'मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र जाम करू', बच्चू कडूंचा सरकारला थेट इशारा
Ravikant Tupkar : 'आमदारच नव्हे, दोन-चार मंत्र्यांना कापा',तुपकरांचे चिथावणीखोर वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Actress Lives In 100 Year Old Bungalow: 100 वर्ष जुन्या आलिशान बंगल्यात राहते सैफ अली खानची 'ही' हिरोईन; शाहरुखच्या मन्नतपेक्षाही कित्येक पटींनी सुंदर हिचं घर!
100 वर्ष जुन्या आलिशान बंगल्यात राहते सैफची 'ही' हिरोईन; शाहरुखच्या मन्नतपेक्षाही कित्येक पटींनी सुंदर हिचं घर!
Maharashtra Live blog: बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाचा नवा दिवस, रात्रभर रस्त्यावरच झोपले
Maharashtra Live blog: बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाचा नवा दिवस, रात्रभर रस्त्यावरच झोपले
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार,  टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार, टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
Montha Cyclone Maharashtra Weather: मोंथा चक्रीवादळामुळे कोकणातील समुद्र खवळला, उरणमधील बोट समुद्रात भरकटली, 50 खलाशांशी संपर्क तुटला
मोंथा चक्रीवादळामुळे कोकणातील समुद्र खवळला, उरणची बोट समुद्रात भरकटली, 50 खलाशांशी संपर्क तुटला
Hyderabad Balloon Flights : हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
BMC Election Uddhav Thackeray: BMC निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, 60 पेक्षा जास्त वय असलेल्या नगरसेवकांना उमेदवारी नाही, नव्या चेहऱ्यांना संधी
BMC निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, 60 पेक्षा जास्त वय असलेल्या नगरसेवकांना उमेदवारी नाही, नव्या चेहऱ्यांना संधी
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार
Cyclone Montha : चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
Embed widget