एक्स्प्लोर
ठाण्यात गुन्हा नोंदवलेल्या गोविंदा पथकांना राज ठाकरे भेटणार
ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या ठाण्याच्या दौऱ्यावर आहेत. दहीहंडीच्या दिवशी गुन्हे दाखल झालेल्या गोविंदा पथकांची भेट राज ठाकरे घेणार आहेत. ठाण्यात 16 गोविंदा पथकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यातील नौपाड्यात मनसेने कायदेभंग दहीहंडीचं आयोजन केलं होतं. नऊ थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला 11 लाखांचं बक्षीस मनसेतर्फे जाहीर करण्यात आलं होतं. जय जवान मंडळाने 9 थरांची सलामी दिली. यावेळी पोलिसांनी कुणालाही रोखलं नाही. मात्र, कोर्टाच्या निर्णयाचा अवमान केल्याप्रकरणी मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला.
सुप्रीम कोर्टाने दहीहंडीबाबत आखून दिलेले नियम मनसेकडून पायदळी तुडवण्यात आले. चेंबुर, ठाण्यामध्ये मनसेने थरांचं बंधन धुडकावून लावत उंच दहीहंडी रचली. 20 फुटांच्या वर दहीहंडी बांधण्याला आणि 18 वर्षाखालील गोविंदांच्या सहभागाला सुप्रीम कोर्टानं बंदी घातली आहे.
कोर्टाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या जय जवान पथक आणि ठाण्यातील नौपाडामधील मनसेचे हंडी आयोजक अविनाश जाधवांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आयोजक भोसलेंना यासंदर्भातली नोटीस धाडली आहे.
संबंधित बातम्या :
गोविंदा सहाव्या थरावरुन पडतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद
सहाव्या थरावरुन पडल्याने गोविंदा गंभीर जखमी
मुंबईत अनेक ठिकाणी मनोरे कोसळले, 126 गोविंदा जखमी
'साहेबांवर 92 गुन्हे, माझ्यावर एक गुन्हा दाखल केल्यानं काय फरक पडतो'
एसीमध्ये बसून बोलायला काय जातं?, राम कदमांची राज ठाकरेंवर टीका
ठाण्यात 9 थर रचणाऱ्या 'जय जवान' मंडळावर गुन्हा दाखल
मुंबईत कोणाची हंडी किती उंच?
नऊ थर, 40 फूट, 11 लाखांचं बक्षीस, ठाण्यात मनसेची कायदाभंग हंडी
डोंबिवलीत पहिलीच हंडी 5 थरांची, कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन
डॉ. अहमद यांच्या घरी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह
देशभरात कृष्णजन्माचा उत्साह, मथुरा-द्वारकेत भाविकांची गर्दी
हौशी महिला प्रवाशांची कर्जत लोकलमध्येच दहीहंडी
दहीहंडीचे मनोरे 20 फुटापर्यंतच, नियम बदलणार नाही
दहीहंडी थराने नाही, तर मिसाईलने फोडायची का? राज ठाकरेंचा सवाल
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही मनसेची नऊ थरांची दहीहंडी
‘देशात हिंदूंनी सण साजरा करणं म्हणजे अपराध’, ‘सामना’तून बोचरी टीका
‘जय जवान’ची दहीहंडीसाठी सुप्रीम कोर्टात धाव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
विश्व
Advertisement