एक्स्प्लोर
लगोरीचे किती थर लावायचे कोर्टाला विचारा, राज ठाकरेंचा सल्ला
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत महालगोरी स्पर्धेची घोषणा करण्यात आली. यावेळी 'लगोरी खेळणार असाल तर लगोरीचे किती थर लावायचे ते आधी कोर्टाला विचारा मग स्पर्धा आयोजित करा' असा सल्ला स्पर्धेच्या आयोजकांना राज ठाकरेंनी दिला.
खरं तर सध्या असे असंख्य खेळ आहेत जे काळाच्या प्रवाहात नामशेष होत चालले आहेत. लगोरी हा त्यापैकीच एक खेळ. या खेळाला उर्जितावस्थेत आणण्यासाठी या महालगोरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या ट्रॉफीचं अनावरण राज ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं. महालगोरीचा हा खेळ सप्टेंबर महिन्यात रंगणार आहे.
लगोरी खेळणार असाल तर लगोरीचे किती थर लावायचे ते आधी कोर्टाला विचारा मग स्पर्धा आयोजित करा असा सल्ला राज ठाकरेंनी महालगोरी स्पर्धेच्या आयोजकांना दिला. विस्मरणात चाललेल्या मराठमोळ्या खेळांना परत उर्जितावस्थेत आणण्यासाठी मराठी कलाकारांच्या महालगोरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
या स्पर्धेतून गोळा होणार निधी हा महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी दिला जाणार आहे. व्हिडिओ गेम्स आणि सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत रमलेल्या नव्या पिढीला लगोरीसारखे खेळ कळावेत आणि या खेळाची परंपरा अशीच पुढे चालत राहावी यासाठी आयोजकांनी हा खेळ आयोजित केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement