एक्स्प्लोर
मुंबईसह उपनगरात पावसाची तुफान बॅटिंग

मुंबई: मान्सूनचं मुंबईत आगमन झाल्याची माहिती कुलाबा वेधशाळेनं दिली असून, सध्या मुंबईत ठिकठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईतील काही सखल भागात पाणी साचल्याचीही माहिती मिळते आहे. मुंबईप्रमाणे लगतची उपनगरं, ठाणे आणि नवी मुंबईतही चांगलाच पाऊस बरसतो आहे. संध्याकाळी मुंबईत वीजेच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. दरम्यान पावसाच्या जोरामुळं तुलसी पाईपलाईन मार्गावर झाडं पडलं असून वांद्रेच्या दिशेनं जाणारी वाहतूक बंद करण्यात आल्याचं समजतं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























