एक्स्प्लोर
रेल्वेचं स्वाईप मशिन, प्रवाशांना 30 रुपयांचा भुर्दंड

मुंबई: रेल्वेनं ग्राहकांच्या सोयीसाठी स्वाईप मशिनची सोय केली आहे. परंतु त्यासाठी ग्राहकांना स्वतःच्या खिशातून जास्तीचे ३० रूपये द्यावे लागत आहेत. त्यामुळे ग्राहकांसाठी हा विकतचा मनस्ताप झाला आहे. हे पैसे नेमके का घेतले जात आहेत आणि कोणाच्या खात्यात जमा होतात याची कोणतीही कल्पना ग्राहकांना दिली जात नाही. त्यामुळे स्वाईप मशीन असूनसुध्दा अनेकांना रोख व्यवहारच करावा लागतोय. या सगळ्यावर आम्ही रेल्वे प्रशासनाशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण हे पैसे बँक चार्ज करते, त्यामुळे रेल्वे बोलणार नाही असं सांगण्यात आलं. पण या गोंधळात ग्राहकांना स्वाईप मशीनचाही उपयोग करता येत नाही. आणि नोटबंदीमुळे रोख रक्कमही देता येत नाही. त्यामुळे यामध्ये ग्राहक मात्र नाहक भरडला जातोय.
आणखी वाचा























