एक्स्प्लोर
Advertisement
खुशखबर ! रेलटेलने देशातील 4000 रेल्वेस्टेशनवर सुरू केली प्रीपेड वायफाय सेवा
रेलटेल देशातील 5950 रेल्वे स्टेशनवर मोफत वायफाय सेवा देत आहे. यासाठी स्मार्टफोनधारकांना ओटीपी कोडद्वारे व्हेरीफिकेशन करावे लागेल. जाणून घेऊयात नविन वायफाय सेवेचे प्रीपेड प्लॅन्स कोणते आहेत.
मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. रेल्वे पीएसयू रेलटेलने कालपासून आपली प्रीपेड वायफायची सेवा सुरु केली आहे. यामुळे देशातील 4000 रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना प्रीपेड हाय-स्पीडचा वापर करता येणार आहे. यासाठी प्रवासी नेट - बँकिंग, ई - वॉलेट आणि क्रेडिट कार्डचा वापर करु शकतात.
सर्व रेल्वेस्टेशनांना करणार वायफायने परिपूर्ण
रेलटेलचे सीएमडी पुनीत चावला यांनी सांगितले की, 'आम्ही यूपीमधील 20 रेल्वे स्टेशनवर प्रीपेड वायफायची टेस्ट केली. यामध्ये मिळालेल्या प्रतिसादानुसार आम्ही या योजनेची सुरुवात भारतातील चार हजारपेक्षा जास्त रेल्वे स्टेशनवर करणार आहोत. आमची ही योजना सर्व रेल्वे स्थानकांना वायफायला जोडण्यासाठी आहे'.
यापद्धतीने करु शकता पेमेंट
पुनीत चावला म्हणाले की, 'प्लॅनच्या स्कीम अशा पद्धतीच्या आहेत की प्रवासी आपल्या गरजेनुसार आपल्याला हवा तो प्लॅन विकत घेऊ शकतो'. प्रीपेड पेमेंटसाठी प्रवासी नेट - बॅंकिंग, ई-वॉलेट आणि क्रेडिट कार्डचा वापर करु शकतो. प्रवासी हे प्लॅन ऑनलाईन विकत घेऊ शकतात. चावला पुढे म्हणाले की, 'कोरोना व्हायरस येण्याआधी प्रत्येक महिन्यात जवळजवळ तीन करोड लोकं या योजनेचा लाभ घेत होती. सगळं पूर्वीसारखं सुरळीत होईपर्यंत आणि प्रवासी संख्या वाढेपर्यंत प्रीपेड वायफाय सेवेतून 10 - 15 करोड रुपयांचा वार्षिक महसूल मिळण्याची शक्यता आहे.
हे आहेत प्लॅन्स
10 रुपयांत 5 GB डेटा, व्हॅलिडीटी एक दिवस
10 रुपयांत 10 GB डेटा, व्हॅलिडीटी एक दिवस
20 रुपयांत 10 GB डेटा, व्हॅलिडीटी पाच दिवस
30 रुपयांत 20 GB डेटा, व्हॅलिडीटी पाच दिवस
40 रुपयांत 20 GB डेटा, व्हॅलिडीटी दहा दिवस
50 रुपयांत 30 GB डेटा, व्हॅलिडीटी दहा दिवस
70 रुपयांत 60 GB डेटा, व्हॅलिडीटी तीस दिवस
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement