एक्स्प्लोर
पक्षांतर्गत गोष्टींवर राणेंचं जाहीर बोलणं चुकीचं: विखे-पाटील
मुंबई: 'नारायण राणे हे पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यासारख्या नेत्यानं पक्षांअतर्गत गोष्टी अशा जाहीर बोलणं चुकीचं आहे. त्यांना जाणवणाऱ्यां गोष्टी किंवा तक्रारी त्यांनी पक्षाला कळवायला हव्यात. पक्षात त्यावर नक्कीच चर्चा होईल. पण अशी जाहीरपणे वक्तव्य केल्यानं कार्यकर्त्यांची उमेद कमी होते.' असं मत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मांडलं. एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
यावेळी बोलताना विखे-पाटलांनी नगरपालिका निवडणूक आणि बाळासाहेब थोरात यांच्याविषयी आपली मतं व्यक्त केली.
'लोकसभा आणि विधानसभा निकालानंतर पुन्हा पक्षाची बांधणी करणं हे मोठं आव्हान होतं. पण प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी ती कामगिरी चांगली बजावली आहे. त्यामुळेच नगरपालिकेत काँग्रेसला चांगलं यश मिळालं.' असं विखे-पाटील म्हणाले.
'विरोधक माझ्यावर बेछूट आरोप करतात. बहुदा विरोधकांना आरोप करताना समाधान मिळत असेल. त्यामुळे त्यांनी आरोप करत राहावं. विरोधकांच्या आरोपाला माझ्या दृष्टीने फार महत्व नाही.' असंही विखे-पाटील म्हणाले.
'बाळासाहेब थोरात यांना माझ्याबद्दल आक्षेप का आहे हे मला कळत नाही. त्यांनी काय बोलावं आणि काय बोलू नये हा त्यांचा प्रश्न आहे. ते वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी मी काहीही सांगणं उचित नाही. मी पक्षाच्या चौकटीत राहून काम करतो.' असं म्हणत विखे-पाटलांनी थोरातांच्या टीकेवर उत्तर देणं टाळलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement