एक्स्प्लोर
Advertisement
अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची दोन तास चर्चा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अमित शाह संध्याकाळी 7.45 वाजताच्या सुमारास मातोश्रीवर दाखल झाले होते.
मुंबई: भाजपचे अध्यक्ष अमित शाह मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. दोघांमध्ये बंद दाराआड तब्बल दोन तास चर्चा रंगली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अमित शाह संध्याकाळी 7.45 वाजताच्या सुमारास मातोश्रीवर दाखल झाले. सुरुवातीला फडणवीस, शाह, उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे या चौघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर केवळ अमित शाह आणि उद्धव ठाकरे या दोघांनीच काही काळ खलबतं केली.
आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांनी अमित शाह यांचं पुष्पगुच्छ देऊन 'मातोश्री'वर स्वागत केलं.
विशेष म्हणजे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची मातोश्रीवरुन परत पाठवणी झाल्याचं म्हटलं गेलं. शिवसेना मंत्र्यांच्या तक्रारीमुळे दानवेंना परत पाठवल्याची चर्चा होती. मात्र दानवेंनी नियोजित कार्यक्रमानुसार आपण मातोश्रीवर जाणार नसल्याचं सांगितलं.
शाह-ठाकरे यांची भेट होणार की नाही याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. कारण अमित शाहांच्या अधिकृत दौऱ्यामध्ये ‘मातोश्री’वरील भेटीचा उल्लेखच नव्हता.
भाजपकडून यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या दौऱ्याच्या वेळापत्रकात ‘मातोश्री’ भेटीची वेळ ठरली होती. त्यानुसार संध्याकाळी 7.30 वा. अमित शाह हे मातोश्री येथे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ह्यांची भेट घेणार होते. मात्र नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकात, मातोश्री भेटीचा उल्लेख नसल्यामुळे शिवसेनेच्या टीकेनंतर भाजपने अमित शाहांचा प्लॅन बदलला तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
LIVE UPDATE
अमित शाह आणि उद्धव ठाकरे येत्या महिन्यात दोन ते तीन बैठका घेणार, समन्वय वाढवण्यासाठी दोन्ही पक्षांचा निर्णय दोन तासांनंतर अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यातली बैठक संपली, चर्चेचा तपशील गुलदस्त्यात चर्चासमाप्तीची नियोजित वेळ (रात्री 8.30 वाजता) उलटून गेल्यानंतरही अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची बैठक सुरुच अमित शाह, उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांची एकत्रित बंद दाराआड चर्चा सुरु अमित शहा, मुख्यमंत्री, उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या चहापानानंतर आता उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात दुसऱ्या मजल्यावर बंद दाराआड बैठक सुरु अमित शाह यांचं 'मातोश्री'वर आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत. अमित शाह आणि मुख्यमंत्री 'मातोश्री'वर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची परत पाठवणी, शिवसेना मंत्र्यांच्या तक्रारीमुळे दानवेंना परत पाठवल्याची चर्चा अमित शाह, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची प्राथमिक चर्चा, त्यानंतर उद्धव आणि शाह या दोघांचीच बैठक होणारअमित शाह भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या निवासस्थानी, तिथून 'मातोश्री'वर जाणार शिवसेनेसोबत फक्त लोकसभाच नाही, विधानसभाही लढू, युती होणारच, अमित शाहांचा दावा अमित शाह सपत्नीक सिद्धीविनायकाच्या दर्शनाला, मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती, यानंतर 'मातोश्री'वर जाणार आज अमित शहा यांच्या आदरतीथ्यासाठी 'मातोश्री'वर खास गुजराती पदार्थ नाश्त्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. ढोकळा, गाठिया आणि खांडवी हे गुजराती पदार्थ नाश्त्यामध्ये असणार आहेत. मात्र ही नाश्ता डिप्लोमसी खरोखरच शिवेसना भाजपचं मनोमिलन करणार का...? हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. अमित शाहांच्या पाहुणचारासाठी गुजराती पदार्थ, ढोकळा, खांडवी, गाठी या पदार्थांचा समावेश असेल. लता मंगेशकरांची प्रकृती बिघडली, अमित शाहांसोबतची भेट पुढे ढकललीVIDEO : मुंबई : 'मातोश्री'भेटीपूर्वी भाजपाध्यक्ष अमित शाह सिद्धिविनायकाच्या चरणी https://t.co/uftbzENETA pic.twitter.com/mkz4i0cWCZ
— ABP माझा (@abpmajhatv) June 6, 2018
अमित शाह माधुरी दीक्षितच्या घरी दाखल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित अमित शहा-उद्धव ठाकरेंच्या आजच्या भेटीत कुठलाही बदल नाही, भेट निश्चित- सूत्र अमित शाह माधुरी दीक्षितच्या घराकडे रवाना आशिष शेलार, विनोद तावडे बैठकीला उपस्थित भाजपची रंगशारदा सभागृहात महत्त्वाची बैठक, अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रावसाहेब दानवे उपस्थित अमित शाह यांच्या दौऱ्याचं सुधारित वेळापत्रक दुपारी 12.30 – माधुरी दीक्षितशी भेट दु. 1.45 - मलबार हिल येथील सह्याद्री अतिथी गृहात विश्रांती दु. 4.30 - उद्योगपती रतन टाटा यांची भेट संध्या. 5.30 – पेडर रोड इथे लता मंगेशकर यांची भेट 6.45 – प्रभादेवी- सिद्धिविनायकाचं दर्शन 7.00 वा – वांद्रे- आशिष शेलार यांच्या निवासस्थानी भेट 9.45 वा – मलबार हिल – सह्याद्री अथितीगृहात मुक्काम या दौऱ्यात मातोश्री भेटीचा उल्लेख नाही. अमित शाह यांच्या दौऱ्याचं यापूर्वीचं वेळापत्रक 12 वाजता - मुंबई विमानतळावर आगमन 12:30 वाजता - मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना मातृशोक झाल्याने त्यांची आणि त्यांच्या परिवाराची वांद्रे येथे भेट. 1 वाजता - रंगशारदा येथे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील आणि संगठन मंत्री विजय पुराणिक यांच्याशी चर्चा 3:30 वाजता - अभिनेत्री माधुरी दीक्षित ह्यांची जुहू येथे त्यांच्या निवासस्थानी भेट 4:30 वाजता - भारतरत्न लता मंगेशकर ह्यांची पेडर रोड या निवास्थानी भेट 5:30 वाजता - उद्योगपती रतन टाटा ह्यांची कुलाबा येथे निवासस्थानी भेट 7:30 वाजता - मातोश्री येथे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ह्यांची भेट 9 वाजता - सह्याद्री गेस्ट हाऊस भाजप राज्य निवडणूक प्रचार समितीची लोकसभा निवडणुक तयारी आणि आढावा बैठक 10:30 वाजता - वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि संगठण मंत्री विजय पुराणिक यांच्यासोबत चर्चा सामना’तून टीकास्त्र दरम्यान शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून भाजपच्या ‘संपर्क फॉर समर्थन’ या अभियानावर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. देशात पेट्रोलचा भडका उडाला असून महागाईचा वणवा पेटला आहे, शेतकरी संपावर आहेत... आणि शेतकऱ्यांशी सरकारचा संपर्क तुटल्याने संप मोडून काढण्याचे काम सुरु आहे. पालघर पोटनिवडणुकीप्रमाणे साम, दाम, दंड, भेद वापरुन शेतकरी संप मोडून काढू असे प्रयत्न सुरु आहेत. अशा परिस्थितीत मोदी जगात आणि शहा देशात संपर्क मोहीम राबवत आहेत, त्यांच्या संपर्क कलेचे कौतुक करावे तेवढे थोडेच, अशा शब्दात शिवसेनेने भाजपला टोमणा लगावला आहे. तर आगामी 2019च्या निवडणुका शिवसेना स्वतंत्रपणे लढणार आहे.. यावर पुन्हा एकदा जोर देण्यात आला आहे. 2019 च्या निवडणुका शिवसेना स्वतंत्रपणे लढणारच आहे. पालघर पोटनिवडणुकीतील निकालाने शिवसेनेचे ‘स्व’बळ दाखवून दिले आहेच. तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या या संपर्क अभियानामागे 2019 च्या सार्वत्रिक निवडणुका हे एक कारण होऊ शकते; पण मुळात सरकार पक्षाचा जनतेशी संपर्क तुटला आहे व त्यामागची कारणे शोधायला हवीत, असंही सामनात म्हटलं आहे. संबंधित बातम्या अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याचा अजेंडा काय? अमित शाह 'मातोश्री'वर जाणार, उद्धव ठाकरेंची भेट घेणार शिवसेनेच्या ताकदीने अनेकांना धडकी भरली : संजय राऊतआदरणीय लता दीदी, आप शीघ्र स्वस्थ हों ईश्वर से ऐसी कामना करता हूँ। मैं अपने अगले मुम्बई प्रवास पर आपसे भेंट करूँगा। https://t.co/xkRQSEvk7B
— Amit Shah (@AmitShah) June 6, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement