एक्स्प्लोर
Advertisement
VJTI मध्ये प्राध्यपकाकडून विद्यार्थिनीच्या विनयभंगाचा प्रयत्न
विद्यार्थिनीला कॉलेज सुटेपर्यंत गणित विषयाच्या जनरल बुकवर सहीसाठी ताटकळत ठेवलं आणि कॉलेज सुटल्यानंतर साधारणत सव्वा पाचनंतर तिला आपल्या केबिनमध्ये बोलवून विनयभंगचा प्रयत्न केल्याचा आरोप मुलीने केला.
मुंबई : मुंबईतील नामांकित अशा वीर जिजामाता टेक्निकल इंस्टिट्युटमध्ये (व्हीजेटीआय) अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीवर गणिताच्या प्राध्यापकानी विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा समोर आलं आहे. ही घटना 18 मे रोजी घडल्यानंतर आज 10 दिवसांनी गणिताचे प्राध्यापक बी जी बेलापट्टी यांच्यावर आज माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हीजेटीआय महाविद्यालयात 18 मे रोजी या प्राध्यापकाने या विद्यार्थिनीला कॉलेज सुटेपर्यंत गणित विषयाच्या जनरल बुकवर सहीसाठी ताटकळत ठेवलं आणि कॉलेज सुटल्यानंतर साधारणत सव्वा पाचनंतर तिला आपल्या केबिनमध्ये बोलवून विनयभंगचा प्रयत्न केल्याचा आरोप मुलीने केला.
हे प्रकरण कॉलेजकडून दडपण्याचा प्रयत्न होत असताना विद्यार्थिनीने विद्यार्थी संघटनेकडे धाव घेतली. त्यानंतर आज युवसेना त्यासोबतच राष्ट्रवादी विद्यार्थी सेनेने आंदोलन करून यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर 10 दिवसांनंतर या प्राध्यापकावर आज विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement