एक्स्प्लोर
दादरमध्ये खासगी बस उलटली, एकाचा मृत्यू तर 35 प्रवासी जखमी
मुंबई : मुंबईतल्या दादर टीटी भागात एक खासगी बस पटली झाली आहे. यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे.
मुंबईतल्या दादर टीटी भागातून बोरिवलीहून रत्नागिरीला जाणारी एक खासगी बस पटली झाली. यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, सध्या खासगी बसच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण गेल्या दोन दिवसांत खासगी बसच्या अपघातात दोनजण दगावले आहेत. तर 40 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
काल विक्रोळीजवळच्या गांधीनगर फ्लायओव्हरजवळ बस उलटून एकाचा मृत्यू झाला होता. दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारा ही घटना घडली होती. या अपघातानंतर गांधीनगर फ्लायओव्हरवर मोठी वाहतूककोंडी झाली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement