कोरोनामुळे अडचणीत आलेल्या समाजाला राज्य सरकारने अनुदान द्यावं : प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केल्याचे सांगितले. तर विकास दुबेच्या एन्काऊंटरवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज मातोश्री येथ जाऊन भेट घेतली. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अडचणीत सापडलेल्या समाजाच्या चर्चेसाठी ही भेट घेण्यात आल्याचे प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सांगण्यात आलं. यावेळी विकास दुबे याच्या एन्काऊंटरवर प्रकाश आंबेडकर यांनी काही प्रश्न उपस्थित केले.
कोळी समाजाची तीन नावं आहेत. मात्र, त्यांचा व्यवसाय हा एकच आहे. सध्या मासे लिलाव पद्धतीने विकली जाते. मात्र, गरीब समूह असल्यामुळे अशा लिलावात भाग घेऊ शकत नाही. त्यामुळे तळे बॉन्ड माइनर आणि मेडियम इरिगेशन डॅम यामधील माश्यांचा लिलाव होऊ नये, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.
ज्या मच्छिमारांच्या सहकारी संस्था आहेत. त्यांचे अध्यक्ष, सेक्रेटरी आणि खजिनदार हा मच्छीमार समाजाचा आहे, त्यालाच याचे अधिकार देण्याची मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली. ज्यामुळे 25 ते 30 लाख असलेला हा समाज स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. त्याला सरकारने मदत करण्याची गरज भासणार नाही आणि जेणेकरुन हलाखीची परिस्थिती सोसत असलेला हा समाज पुन्हा आपल्या पायावर उभा राहू शकेल.
सुतार, कुंभार, लोहार अशा समाजातील त्यांचे संसार या कोरोना संसर्गामुळे उद्ध्वस्त झाले आहेत. या समाजातील लोकांना बँकांकडून काही मदत मिळत नसल्याचा आरोपही वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यावेळेस केला. ज्यामुळे सरकारने अश्यावेळी पुढे येऊन त्यांना मदत करायला हवी. तसेच ज्यांच माती उचलायचं लायसन्स आहे किंवा कुंभाराचा लायसन्स आहे, या सर्वांना शासनाने 50 हजार रुपये म्हणून अनुदान द्यावं. याचा बोजा शासनावर वीस-पंचवीस कोटी रुपयांचा येईल. तसेच राज्यातील इतर परिस्थितीवर चर्चा झाली.
विकास दुबेची अटक ते एन्काऊटर... गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
विकास दुबे एन्काऊंटर 8 दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गुंड विकास दुबे याचा आज एन्काऊंटर करण्यात आला. मात्र, या एन्काऊंटरवर प्रकाश आंबेडकर यांनी काही प्रश्न उपस्थित केले. हा एन्काऊंटर चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. या एन्काऊंटरमध्ये एकच झालं की दुबेला जी टीप देण्यात आली, त्या टीप देणाऱ्यामध्ये वरिष्ठ किती होते? ती लिंक पूर्णपणे तुटली आहे. हा एन्काउंटर काही जणांना वाचवण्यासाठी झाल्याचा देखील प्रकाश आंबेडकर यावेळेस म्हणाले.
Vikas Dubey Encounter | स्वतःच्या बचावासाठी पोलिसांनी दुबेचा एन्काऊंटर केला : UP ADG प्रशांत कुमार