एक्स्प्लोर
आठवलेंनी आपला बंगला दान द्यावा, आम्ही वाद मिटवू- प्रकाश आंबेडकर
मुंबईः रामदास आठवलेंनी वांद्रे येथील बंगला आपणास दान द्यावा आणि उदारमनाने झोपडीत राहायला जावं, तसं झाल्यास आपण वाद मिटवायला तयार आहोत, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी आठवलेंचा समाचार घेतला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांना नव्याने उभारण्यात येणाऱ्या 17 मजली आंबेडकर भवनच्या वास्तूमध्ये दुप्पट जागा देऊन सध्याचा वाद मिटवावा, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी करताच प्रकाश आंबेडकर यांनी त्यावर पलटवार केला आहे.
आठवलेंची आंबेडकर बंधूंवर टीका
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी कायम योगदान दिलं, मात्र त्यांचे तिन्ही नातू बाबासाहेबांच्या सर्व संस्थांमध्ये विश्वस्तपदासाठी कायम भांडत आहेत, म्हणूनच आंबेडकर बंधू समाजाच्या आदरास पात्र नाहीत, अशी टीका आठवले यांनी केली आहे.
प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांनी दादरच्या आंबेडकर भवनाचा वाद सामोपचाराने मिटवावा, असं आवाहन आठवले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement