एक्स्प्लोर
राणेंविरोधात पोस्टरबाजी, शिवसेनेच्या अरविंद भोसलेंवर गुन्हा
महापालिकेतील वरिष्ठ निरीक्षक दिलीप कारखानीस यांच्या तक्रारीनंतर सोमवारी रात्री गुन्हा दाखल झाला.

मुंबई : नारायण राणे यांच्या विरोधात केलेली पोस्टरबाजी शिवसेनेच्या अंगलट आली आहे. शिवसेनेचे नगरसेवक आणि प्रवक्ते अरविंद भोसले यांच्याविरोधात मुंबईतील वरळी पोलिस स्थानकात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेतील वरिष्ठ निरीक्षक दिलीप कारखानीस यांच्या तक्रारीनंतर सोमवारी रात्री गुन्हा दाखल झाला. अरविंद भोसले यांनी नारायण राणे यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत पोस्टरमधून टीका केली होती. नारायण राणेंच्या संभाव्य भाजप प्रवेशावरुन शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. वरळीत लावलेल्या एका पोस्टरमधून राणेंवर अत्यंत विखारी भाषेत टीका केली आहे. वरळी नाक्यावर शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांनी हे पोस्टर लावलं.
शिवसेनेचं पोस्टर, नारायण राणेंवर विखारी टीका
या होर्डिंगमध्ये भाजपलाही लक्ष्य करण्यात आलं आहे. होर्डिंगमध्ये रेखाटण्यात आलेली चित्रे आणि त्यातील भाषा वादग्रस्त आहे. राणेंनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर शिवसेनेनं प्रतिक्रिया देण्याचं टाळलं होतं, पण आता पोस्टर लावून शिवसेनेनं राणेंच्या विरोधात आवाज उठवलेला पाहायला मिळत आहे.आणखी वाचा























