एक्स्प्लोर

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; भाजपची मागणी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपनं केली आहे. पूजा चव्हाण या तरुणीची आत्महत्या नसून हत्याच असल्याचा खळबळजनक आरोप भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला आहे.

मुंबई : काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील वानवडी परिसरात पूजा चव्हाण नावाच्या एका 22 वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. सोशल मीडियावर 'टिक-टॉक स्टार' अशी पूजाची ओळख होती. अशातच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अनेक नवनवी माहिती समोर येऊ लागली आहे. अशातच आता भाजपकडून थेट संजय राठोड यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणाशी संजय राठोड यांचा संबंध असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपनं केली आहे. पूजा चव्हाण या तरुणीची आत्महत्या नसून हत्याच असल्याचा खळबळजनक आरोप भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला आहे. दरम्यान, भाजपनं केलेल्या गंभीर आरोपानंतर एबीपी माझानं मंत्री संजय राठोड यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर 12 ऑडिओ क्लिप व्हायरल झालेल्या आहेत. त्यानंतर व्हायरल होणाऱ्या या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राठोड आणि त्यांच्या पीएचा आवाज असल्याचा दावा सोशल माध्यमांमधून करण्यात येत आहे.

काय म्हणाल्या भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ?

"पूजा चव्हाण या युवतीची आत्महत्या नसून ती हत्याच असल्याचे बरेच अपडेट्स गेल्या दोन दिवसांमध्ये आपल्यासमोर आलेले आहेत. त्यामध्ये जवळपास 10 ते 11 ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. काही फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यामधून तिला आत्महत्येसाठी परावृत्त करण्यापासून ते तिची आत्महत्या झाल्यानंतर तिची मोबाईल ताब्यात घे, असं मंत्री संजय राठोड त्या माणसाला सांगत आहेत, हे त्या क्लिपमध्ये ऐकू येत आहे. तसेच पोलीस अद्यापही याप्रकरणी स्पष्टता देत नाहीत. पूजा राठोड हिच्या कुटुंबियांवर दबाव असू शकतो. पोलिसांनी सद्दसद विवेकबुद्धी कायम ठेवून गुन्हा दाखल केला पाहिजे." , असं भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या.

दरम्यान, पूजाच्या आत्महत्या प्रकरणात राज्याच्या आघाडी सरकारमधील विदर्भातल्या एका बड्या मंत्र्याचं नाव समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. अशातच सध्या याप्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याचं नाव समोर आल्यानं भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी सखोल चौकशीची आणि तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

पूजा चव्हाण ही बीड जिल्ह्यातील 22 वर्षीय तरूणी अभ्यासासाठी पुण्याला रहायला आली होती. इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी ती भाऊ आणि मित्रासोबत रहात होती. ती पुण्यातील वानवडी येथील हेवन पार्क सोसायटीत राहत होती. सोशल मीडियात विशेषत: टिकटॉक अॅपमुळं ती प्रचंड लोकप्रिय झाली होती. रविवारी 7 फेब्रुवारीच्या रात्री तिनं इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर काही दिवसांतच या प्रकरणाशी विदर्भातील एका कॅबिनेट मंत्र्याचा संबंध असल्याचे आरोप झाले. याला कारण ठरलंय या संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दोन ऑडिओ क्लिप. यात पुजा, तिचा मित्र आणि संबंधित मंत्र्यांचे संभाषण आहे. संभाषणाच्या भाषेवर त्यांच्यात नेमकं काय संबंध होते? हा प्रश्न निर्माण होतो आहे.

मात्र, पूजानं मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. शिवाय, आमच्याकडं कोणाच्याही विरोधात तक्रार आली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं. मात्र, या प्रकरणी एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यामुळं यावरून राजकारण रंगलं आहे.

संबंधित बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaTop 25 : 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 5 जुलै 2024 : शुक्रवार : ABP MajhaCM Eknath Shinde Speech:सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट, मुख्यमंत्र्यांची बॅटिंगShivam Dube speech Vidhan Sabha Maharashtra : मराठी थोडा ट्राय करतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
Embed widget