एक्स्प्लोर
मुंबईत 22 लाखांची लाच घेताना पोलिस निरीक्षक अटकेत
43 वर्षीय आनंद सीताराम भोईर वाईन शॉप मालकाकडून 22 लाखांची लाच घेत होते. भोईर हे अंधेरी एमआयडीसीतील गुन्हे प्रकटीकरण शाखा क्रमांक 10 मध्ये पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
मुंबई : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील लाचखोर पोलिस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. अंधेरी एमआयडीसीतील पोलिस निरीक्षक आनंद भोईर यांना 22 लाखांची लाच घेताना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
43 वर्षीय आनंद सीताराम भोईर वाईन शॉप मालकाकडून 22 लाखांची लाच घेत होते. भोईर हे अंधेरी एमआयडीसीतील गुन्हे प्रकटीकरण शाखा क्रमांक 10 मध्ये पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
स्थानिक पोलीस ठाण्यात कलम 65, 41, 43, 90, 108 महाराष्ट्र कायद्यान्वये 2018 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे तपास अधिकारी म्हणून इन्स्पेक्टर आनंद भोईर कामकाज पाहत होते. वाईन शॉप मालकाविरोधात गुन्हा दाखल असताना अटकेची कारवाई न करण्यासाठी भोईरांनी 25 लाखांची मागणी केली होती.
तडजोडीअंती लाचेची रक्कम 22 लाख रुपये इतकी ठरवण्यात आली. त्यानंतर वाईन शॉप मालकाने लाचलुचपत प्रतिबंध विभागाला याबाबत माहिती दिली. एसीबीने या प्रकरणाची शहनिशा करुन आज सापळा रचला. त्यावेळी खाजगी वाहनात चालकासह भोईर यांना 22 लाख स्वीकारताना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement