एक्स्प्लोर
CCTV : पोलिस कॉन्स्टेबलचा बारमध्ये धुडगूस, मॅनेजरला मारहाण
कॅश काऊंटवर बसणाऱ्याला आणि मॅनेजरला बेदम मारहाण केली.

ठाणे : ठाण्यातील कळवा परिसरातील सायबा बार आणि रेस्टॉरंटमध्ये पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण संकेंनी धुडगूस घातला. कॅश काऊंटवर बसणाऱ्याला आणि मॅनेजरला बेदम मारहाण केली. चार ते पाच दिवसांपूर्वीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हॉटेल चालकाने पोलिस आयुक्तालय, उपायुक्त, एसीपी, कळवा पोलिस ठाणे आणि हॉटेल असोसिएशनकडे तक्रार केली आहे. मात्र, पोलिसांकडून अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही, अशी माहिती हॉटेल चालक उमेश करकेरा यांनी दिली. दारु आणि जेवणाचे एकूण 2 हजार 200 रुपये बिल झाले होते. वाढीव बिलावर डिस्काऊंट देण्यावरुन वाद झाला. तसेच आणखी एका कॉन्स्टेबलला प्रवीण संके मारताना दिसत आहे. तसेच बारच्या बाहेर पडताना देखील याची अरेरावी करताना सीसीटीव्हीत दिसतात. पाहा व्हिडीओ :
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
क्राईम
क्रिकेट




















