एक्स्प्लोर
मन्मथ म्हैसकर आत्महत्या प्रकरण : पोलिसांनी व्हॉट्सअॅप चॅट तपासले
मन्मथ म्हैसकरचा मोबाईल आणि बॅग पोलिसांना सापडली आहे. मुंबई पोलिसांनी त्याचं व्हॉट्सअॅप चॅट चेक केलं आहे. त्यातून मन्मथ तणावात होता, असे जाणवत नाही.
मुंबई : मन्मथ म्हैसकरचा मोबाईल आणि बॅग पोलिसांना सापडली आहे. मुंबई पोलिसांनी त्याचं व्हॉट्सअॅप चॅट चेक केलं आहे. त्यातून मन्मथ तणावात होता, असे पोलिसांना जाणवलं नाही.
मन्मथ सकाळी 6.40 वाजता इमारतीच्या टेरेसवर पोहचला. टेरेसवर तो मित्रांची वाट पाहत होता. मग मन्मथने आत्महत्या केली की अपघाताने खाली पडला, या दिशेने पोलिस आता तपास करत आहेत.
पोलिसांनी अनेकांचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये इमारतीच्या सुरक्षारक्षकाच्या जबाबासह मन्मथचा मृतदेह सर्वात पहिल्यांदा पाहिलेल्या स्थानिकांचेही जबाब नोंदवले गेले आहेत.
काय आहे प्रकरण?
मिलिंद आणि मनिषा म्हैसकर दोघेही आयएस अधिकारी आहेत. त्यांना मन्मथ (वय 18) हा एकुलता एक मुलगा होता.
मन्मथ हा पुण्यात शिक्षण घेत होता. आज (18 जुलै) सकाळी मित्राला भेटायला जातोय, असं सांगून घराबाहेर गेला. मात्र त्याने मलबार हिल परिसरातील नेपियन सी रोडवरील दरिया महल इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं.
मात्र मन्मथच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात असल्याने, पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.
पोलिसांना काय माहिती मिळाली?
आज सकाळी साडेसातच्या सुमारास दरिया महल नेपीयन सी रोड,मलबार हिल,मुंबई या बिल्डिंग वरुन एक इसम पडल्याची माहिती मलबार हिल पोलिसांना मिळाली.
पोलीस ठाण्याचे PSI चौधरी आणि API उंडे घटनास्थळी गेले. त्यावेळी एक व्यक्ती इमारतीवरुन पडल्याचं आढळलं.
अधिक चौकशी केली असता, मृत व्यक्तीचं नाव मन्मथ म्हैसकर असल्याचं समजलं.
मन्मथ आज सकाळी सातच्या सुमारास, मित्र अग्रवाल याला भेटण्यासाठी जात असल्याचं सांगून घराबाहेर पडला होता.
सदर घटना ही मलबार हिल पोलीस ठाणे येथे ADR No.22/17 अन्वये नोंद केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement