एक्स्प्लोर
बालदिनानिमित्त मुंबईत जगातील सर्वात मोठं प्लॅस्टिक बॉल मोझॅक
मोझॅक आर्टमध्ये प्लॅस्टिकच्या सहा हजार चेंडूंचा वापर करण्यात आला आहे. आठ फूट रुंद आणि आठ फूट लांब असं हे भव्य पोर्ट्रेट आहे.

मुंबई : मुंबईतील कलाकार चेतन राऊत यांनी बालदिनाच्या निमित्ताने अनोखा विक्रम केला आहे. राऊत यांनी जगातील सर्वात मोठं प्लॅस्टिक बॉल मोझॅक तयार केलं आहे.
या मोझॅक आर्टमध्ये प्लॅस्टिकच्या सहा हजार चेंडूंचा वापर करण्यात आला आहे. आठ फूट रुंद आणि आठ फूट लांब असं हे भव्य पोर्ट्रेट आहे. या पोर्ट्रेटमध्ये एका आदिवासी मुलाचं चित्र साकारलं असून बालदिन म्हणजेच 14 नोव्हेंबरला त्याच्या वाढदिवशी त्याला हे भेट दिलं जाणार आहे.
हे मोझेक पोर्ट्रेट मुंबईत आरे कॉलनीतल्या मरोशी पाडा येथे साकारण्यात आलं आहे. 13 नोव्हेंबरला 100 आदिवासी मुलांना वारली कलेचे प्रात्यक्षिक दाखवून बालदिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. हे मोझेक पोर्ट्रेट 13 तारखेपासून सर्वांसाठी खुलं ठेवण्यात येत आहे.
याआधी चेतन राऊत यांनी 14 हजार पंचमुखी रुद्राक्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचे मोझेक पोर्ट्रेट साकारले आहे. साडेसहा बाय सात फुटांचे हे मोझेक पोर्ट्रेट होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
