एक्स्प्लोर

Mumbai News : बसस्टँड, स्टेशनवरील लोखंडी खांब व्हीलचेअरसाठी अडथळे; हायकोर्टाची राज्य सरकार, मनपाला नोटीस

Mumbai News : दिव्यांग व्यक्तींसाठी बसस्टँड आणि रेल्वे स्थानकांवर लावलेले लोखंडी खांबही अडचणीचे ठरत असल्याची बाब हायकोर्टाच्या निर्दशनास आणून देण्यात आली. 

Mumbai News : मुंबई : मुंबईतील (Mumbai News) फुटपाथवर वाहनं चढू नयेत, यासाठी लावण्यात आलेले लोखंडी खांब (Steel Poles) व्हिलचेअरसाठी अडथळा ठरत आहेत. याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) राज्य सरकार (Maharashtra Government) आणि महापालिका प्रशासनाला भूमिका स्पष्ट करण्याची नोटीस जारी केली आहे. तसेच, दिव्यांग व्यक्तींसाठी बसस्टँड आणि रेल्वे स्थानकांवर लावलेले लोखंडी खांबही अडचणीचे ठरत असल्याची बाब हायकोर्टाच्या निर्दशनास आणून देण्यात आली. 

मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठानं या गोष्टीची गंभीर दखल घेत याबाबत आजवर काय केलंत असा सवाल महाराष्ट्र राज्य रस्ते नियोजन प्राधिकरणाला विचारला. यावर दोन आठवड्यांत संबंधित सर्व विभागांना भूमिका स्पष्ट करण्याचे देत हायकोर्टानं सुनावणी तीन आठवड्यांसाठी तहकूब केली.

खड्डे आणि उघडी मॅनहोल या प्रकरणांत कोर्टाला अमायकय क्युरी (कोर्टाचा मित्र) म्हणून मदत करत असलेल्या मिस्त्री यांनी उपस्थित केलेल्या या मुद्याची खंडपीठाने गंभीर दखल घेतली. हे प्रकरण सुओमोटो याचिका म्हणून हायकोर्टानं सुनावणीसाठी दाखल करुन घेतलं आहे. आणि यात अॅड. मिस्त्री यांचीच अमायकस क्युरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण? 

जमशेद मिस्त्री यांना 22 सप्टेंबर 2023 रोजी करण सुनील शहा यांनी यासंदर्भात एक ई मेल पाठवला होता. शहा हे व्हीलचेअरचा वापर करतात. मुंबईतील काही पदपथांवर सध्या लोखंडी खांब लावण्यात आले आहेत. वाहनांपासून पदपथ अधिक सुरक्षित करण्यासाठी हे खांब लावले गेले आहेत. पण याचा नाहक त्रास व्हिलचेअरचा वापर करणा-यांना होत आहे. या खांबांमुळे त्यांना पदपथावर जाता येत नाही, असं या ई मेलमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. 

या ई मेलसोबत काही फोटोही जोडण्यात आले आहेत. या दोन खांबांमधील अंतर खूप कमी असतं. तिथून व्हिलचेअर जात नाही. याचा किती आणि कसा अडथळा व्हिलचेअरला होतो हे या फोटोतून स्पष्टपणे दिसत आहे. मद्रास उच्च न्यायालयानंही यासंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश नुकतेच दिले आहेत, असंही जमशेद मिस्त्री यांनी हायकोर्टाला सांगितलं होतं.                                                                                                               

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्राचा म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅपPune Porsche Car Accident Accused Rap Song :जामीन मिळाल्याचा घमंड,  दोघांना चिरडल्यानंतर आरोपीचा रॅपCM Eknath Shinde Sambhajinagar : चारा, पाणी कमी पडून देणार नाही संभाजीनगरमधून शिंदेंचा शब्दShrikant Shinde on Dombivali Blast : डोंबिवली MIDC मध्ये स्फोट, श्रीकांत शिंदे घटनास्थळी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्राचा म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
SDRF बोट दुर्घटनेनंतर स्थानिकांचा आक्रमक पवित्रा, थेट पालकमंत्री विखे पाटलांचा ताफा अडवला
SDRF बोट दुर्घटनेनंतर स्थानिकांचा आक्रमक पवित्रा, थेट पालकमंत्री विखे पाटलांचा ताफा अडवला
Embed widget