एक्स्प्लोर
पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी गाठला नवा उच्चांक
गेल्या सात दिवसांपासून सतत होणाऱ्या दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी नवा उच्चांक गाठला आहे.
मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग सातव्या दिवशी दरवाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या किंमतीत 33 पैशांनी तर डिझेलच्या दरात 26 पैशांनी दरवाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 84 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा 72 रुपये प्रतिलीटर एवढा झाला असून देशात सर्वात महाग पेट्रोल मुंबईत मिळत आहे.दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर 76 रुपयांवर पोहोचलं आहे.
गेल्या सात दिवसांपासून सतत होणाऱ्या दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी नवा उच्चांक गाठला आहे. मागील चार आठवड्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सतत वाढत आहेत. तसंच प्रत्येक राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर वेगवेगळे कर लावण्यात आले आहेत.
कर्नाटक निवडणुकीच्या काही दिवस आधी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. त्यानंतर मागील 7 दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.
मुंबईत पेट्रोल सर्वात महाग :
देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये पेट्रोल सर्वात महाग म्हणजेच 84.07 रुपये लिटर आहे. तर सर्वात स्वस्त पेट्रोल गोव्यात आहे. तिथं पेट्रोलची किंमत 70.26 रुपये लिटर आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
क्राईम
Advertisement