एक्स्प्लोर
एकनाथ खडसेंसाठी पाटीदार समाज मैदानात, आझाद मैदानात आंदोलन
एकनाथ खडसेंसाठी महाराष्ट्रातील पाटीदार समाज आता मैदानात उतरला आहे. एकनाथ खडसेंना योग्य तो न्याय मिळावा, यासाठी आज पाटीदार क्रांती दलाने आझाद मैदानात आंदोलन केलं.

मुंबई : एकनाथ खडसेंसाठी महाराष्ट्रातील पाटीदार समाज आता मैदानात उतरला आहे. एकनाथ खडसेंना योग्य तो न्याय मिळावा, यासाठी आज पाटीदार क्रांती दलाने आझाद मैदानात आंदोलन केलं. तसेच, लेवा पाटीदार समाजाला मंत्रिमंडळात स्थान मिळावं अशीही मागणी यावेळी आंदोलकांनी केली. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या पक्षामध्ये नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी वेळोवेळी सार्वजनिक व्यासपीठावरुन बोलूनही दाखवली आहे. पण तरीही अद्याप त्यांना योग्य ती वागणूक मिळत नसल्याने, महाराष्ट्रातील पाटीदार क्रांती दलाने आझाद मैदानात आंदोलन केलं. "भाजप सरकार हे पाटीदार द्वेष्टे आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा दावेदार असलेल्या ज्येष्ठ नेत्याला घरी बसवले. तेव्हा गुजरातमध्ये जे झाले, त्याची पुनरावृत्ती 2019 मध्ये महाराष्ट्रात होऊ देऊ नका," असा इशारा पाटीदार समाजाचे नेते सुहास बोंडे यांनी यावेळी दिला. तसेच, लेवा पाटीदार समाजाला मंत्रिमंडळात स्थान द्यावी, अशीही मागणी यावेळी त्यांनी केली.
आणखी वाचा























