एक्स्प्लोर
Advertisement
‘पंकज भुजबळांनी मला धमकावलं’, MIT प्रकरणातील सहआरोपीचा दावा
मुंबई: बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी आर्थर रोड कारागृहात असलेले छगन भुजबळ आमि त्यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनी कोर्टाच्या आवारात दमदाटी केल्याचा आणि धमकावल्याचा आरोप, एमआयटी प्रकरणातील सहआरोपी अमित बलराज आणि सुधीर साळस्कर यांनी केला आहे.
एवढंच नव्हे तर सुनावणीला कोर्टात आल्यानंतर छगन भुजबळ आणि समीर भुजबळ हे अनेकांच्या गाठीभेटी घेतात असा दावाही बलराज आणि साळस्करांनी केला आहे.
भुजबळ परिवाराकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप अमित बलराज आणि सुधीर साळस्कर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात करण्यात आला आहे.
पंकज भुजबळांनी मला धमकावलं: अमित बलराज
‘पंकज भुजबळ यांनी माझ्याशी न्यायालयातील सुनावणीच्या वेळी असभ्य वर्तन केलं. पोलीस समोर असतानाही त्यांना कुणीही रोखलं नाही. तुझं काम झालं असताना इथे काय करतोयस?, तुझं काम झालं असेल तर तुम्ही लोक निघून का जात नाही? तू आताच्या आता इथून निघ, नाहीतर याचे वाईट परिणाम तुला भोगावे लागतील. त्यानंतर पंकज भुजबळ आणि छगन भुजबळ यांच्यात हळू कुजबूज सुरु झाली.’ असा आरोप अमित बलराजनं केला आहे.
कोण आहेत अमित बलराज आणि सुधीर साळस्कर?
अमित बलराज आणि सुधीर साळस्कर हे एमआयटीचे कर्मचारी होते. तसंच एमआयटी घोटाळा प्रकरणातील ते सहआरोपी आहेत. तसंच माफीचा साक्षीदार होण्यासाठी त्यांनी अर्ज केला आहे. 30 मे रोजी पीएमपीएल कोर्टात त्यांच्यावर बेतलेला प्रसंग त्यांनी पत्रकाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडला आहे.
संबंधित बातम्या:
‘माझ्यावरील आरोप खोटे, दमानियांवर कायदेशीर कारवाई करु’, भुजबळांचं जेलमधून पत्र
‘भुजबळांना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट’, दमानियांच्या तक्रारीनंतर चौकशीचे आदेश
भुजबळांसाठी जेलमध्ये टीव्ही, चिकन मसाला आणि वोडकाची सोय: दमानिया
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
निवडणूक
क्राईम
Advertisement