एक्स्प्लोर
वादात मध्यस्थी करणाऱ्या खासदार गावितांशी बाचाबाची
वारंवार सांगूनही गवतात बूट घालून चालणाऱ्या पाच जणांना रखवालदाराने हटकले होते. त्यामुळे त्यांनी रखवालदारालाच मारहाण केली. गावित वाद सोडवण्यासाठी मध्ये पडले असता, त्या पाच जणांनी गावितांवरही अरेरावी केली.

पालघर : मीरा रोडमधील जॉगर्स पार्कमध्ये रखवालदार आणि स्थानिकांच्या वादात मध्यस्थी करणारे भाजप खासदार राजेंद्र गावित यांच्याशी बाचाबाची करण्यात आली. या प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मीरा रोड पूर्वेला रेल्वे मार्गालगत पालिकेचं जॉगर्स पार्क आहे. या ठिकाणी पालघरमधील भाजपचे खासदार राजेंद्र गावित यांच्या पुढाकाराने गवताचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. गावित नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले असताना काही जण तिथे रखवालदाराशी वाद घालताना त्यांना दिसले.
वारंवार सांगूनही गवतात बूट घालून चालणाऱ्या पाच जणांना रखवालदाराने हटकले होते. त्यामुळे त्यांनी रखवालदारालाच मारहाण केली. गावित वाद सोडवण्यासाठी मध्ये पडले असता, त्या पाच जणांनी गावितांवरही अरेरावी केली.
या प्रकरणी नया नगर पोलिसांनी पाच जणांना अटक केली. कीर्ती शेट्टी, राजेश विश्वनाथ शेट्टी, नवीन विठ्ठल शेट्टी, सुकेश शेट्टी आणि शिवराम शेट्टी अशी या पाच जणांची नावं आहेत.
गावित यांना मारहाण झाल्याचं सुरुवातीला म्हटलं जात होतं, मात्र खुद्द राजेंद्र गावित यांनीच 'एबीपी माझा'शी बोलताना आपल्याला मारहाण झाली नसल्याचं स्पष्टीकरण दिलं. या वादावर पडदा पडल्याचंही गावितांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
