एक्स्प्लोर
मुंबईसह राज्यभरात मुसळधार, नाशिकमध्ये गोदावरीला पूर
मुंबईसोबतच राज्यभरातही मुसळधार पाऊस सुरु आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणीच पावसाने हजेरी लावली आहे.

मुंबई : मुंबईला यंदाच्या सर्वात मोठ्या पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. पावसाचा जोर आणखी वाढला आहे. येत्या काही तासात आणखी पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे रस्ते, रेल्वे, हवाई अशी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे.
मुंबईसोबतच राज्यभरातही मुसळधार पाऊस सुरु आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणीच पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे सर्व लहान आणि मध्यम प्रकल्प भरले आहेत.
विदर्भ : विदर्भात नागपूर, अकोला, वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस आहे.
मराठवाडा : मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात गेले 4 दिवस पाऊस सुरु आहे. बीड, लातूर उस्मानाबाद जिल्ह्यांत मुसळधार पाऊस आहे. सर्व लहान आणि मध्य प्रकल्प पाण्याने भरले आहेत.
उत्तर महाराष्ट्र : नाशिकमध्ये कालपासून मुसळधार पाऊस आहे. या सततच्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. तर सर्व धरणं भरली आहेत. गोदावरीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
कोकण : मुंबईप्रमाणेच कोकणालाही पावसाने झोडपलं आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.
मुंबईत गेल्या 1 तासात कुठे किती पाऊस?
- अंधेरी - 92मिमी
- बीकेसी - 54मिमी
- वांद्रे पश्चिम - 52 मिमी
- भांडूप - 58 मिमी
- चेंबुर - 62मिमी
- कफपरेड - 10मिमी
- दहिसर 40मिमी
- घाटकोपर पूर्व - 61मिमी
- गोरेगाव - 65मिमी
- परळ - 40मिमी
- कुर्ला - 92मिमी
- अंधेरी - 270 मिमी
- बीकेसी - 204मिमी
- वांद्रे पश्चिम - 247मिमी
- भांडूप - 251 मिमी
- चेंबुर - 214मिमी
- कफपरेड - 123मिमी
- दहिसर - 190मिमी
- घाटकोपर पूर्व - 221 मिमी
- गोरेगाव - 193मिमी
- परळ - 285मिमी
- कुर्ला - 300मिमी
LIVE- मुंबईत पावसाचा जोर वाढला
मुंबईत ‘पाऊस’फुल्ल, ‘या’ रस्त्यांवरुन जाणं टाळा
LIVE : पुढील चार तासात पावसाचा जोर पुन्हा वाढणार – हवामान विभाग
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बुलढाणा
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
