एक्स्प्लोर

Open Deck Bus : BEST चा पर्यटकांना धक्का, ओपन डेक बस हद्दपार होणार, 'मुंबई दर्शन' 5 ऑक्टोबरपासून बंद

Open Deck Bus : मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली डबल डेकर ओपन डेक बस ऑक्टोबरपासून हद्दपार होणार आहे. परिणामी ओपन डेक बसमधून होणारे 'मुंबई दर्शन' 5 ऑक्टोबरपासून बंद होणार आहे.

मुंबई : मुंबई हे शहर गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र राहिलं आहे. मुंबई शहरात लाखों पर्यटक येतात. त्यातच मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली डबल डेकर ओपन डेक बस (Double Decker Open Deck Bus) पुढील महिन्यापासून म्हणजेच ऑक्टोबरपासून हद्दपार होणार आहे. परिणामी ओपन डेक बसमधून होणारे 'मुंबई दर्शन' (Mumbai Darshan) 5 ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. त्यानंतर ओपन डेक बस चालवण्याचा सध्यातरी कुठलाही विचार बेस्ट (BEST) उपक्रमाचा नसल्याचा सांगण्यात आलं आहे. बेस प्रशासनाच्या या निर्णयामुळे मुंबईत फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना मोठा धक्का बसला आहे. 

मुंबई दर्शन 5 ऑक्टोबरपासून बंद होणार

सध्या सेवेत असलेल्या तिन्ही ओपन डेक बसचा आयुर्मान संपल्यामुळे या जुन्या बस आता हद्दपार होणार आहेत. 50 नवीन ओपन डेक बस खरेदीसाठी काढलेली निविदा रद्द केल्याने बेस्टच्या माध्यमातून केले जाणारे 'मुंबई दर्शन' ऑक्टोबरपासून बंद होणार आहे.

तिन्ही बस टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय

मुंबईतील पर्यटनाला चालना मिळावी आणि मुंबईत आलेल्या पर्यटकांना शहरातील पर्यटन स्थळे बसमधून झटपट पाहता यावी यासाठी 26 जानेवारी 1997 पासून एमटीडीसीच्या मदतीने ओपन डेक बस सेवा सुरु करण्यात आली होती. दर महिन्याला जवळपास 20 हजार पर्यटक या बस सेवेचा लाभ घेत असल्याची आकडेवारी आहे.सध्या बेस्टकडे 3 डबल डेकर ओपन डेक बस आहेत. मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात या तिन्ही बस टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाकडून घेण्यात आला आहे.

ओपन डेक बसमधून पर्यटकांचं 'मुंबई दर्शन'

ही ओपन डेक बस नॉन एसी आहे. यात अप्पर डेक आणि लोअर डेक असतात. अप्पर डेक आणि लोअर डेकचं भाडं वेगळं आहे. अप्पर डेक ओपन असल्याने यातून मुंबईची सफर करता येते. जेव्हा ही गाडी सुरु झाली तेव्हा मुंबईतील पश्चिम उपनगरातील पर्यटनस्थळांना भेट दिली जात असे. मात्र आता दक्षिण मुंबईमधील पर्यटन स्थळं या बसच्या माध्यमातून पाहता येत होत्या. 

'या' ठिकाणांची सफर

मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना ओपन डेक बसेसमधून प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, मंत्रालय, विधानभवन, सीएसएमटी, बीएमसी, हुतात्मा चौक, हॉर्निमल सर्कल, आरबीआय, एशियाटिक लायब्ररी, जुनं कस्टम हाऊस, एनसीपीए, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, चर्चगेट स्थानक, ओव्हल मैदान, मुंबई हायकोर्ट आणि मुंबई विद्यापीठ या ठिकाणांची सफर घडवण्यात येत होती. 

हेही वाचा

Electric AC Double Decker Bus : मुंबईत उद्यापासून डबलडेकर एसी बस सीएसएमटी-एनसीपीए दरम्यान धावणार; तिकीट अवघे 6 रुपये

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Embed widget