एक्स्प्लोर

Electric AC Double Decker Bus : मुंबईत उद्यापासून डबलडेकर एसी बस सीएसएमटी-एनसीपीए दरम्यान धावणार; तिकीट अवघे 6 रुपये

Electric AC Double Decker Bus : पहिली डबलडेकर इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस सीएसएमटी आणि एनसीपीएदरम्यान धावणार आहे. त्यासाठी प्रवाशांना पहिल्या पाच किलोमीटरसाठी सहा रुपये मोजावे लागणार आहेत.

Mumbai Electric AC Double Decker Bus : मुंबईत (Mumbai) मंगळवारपासून (21 फेब्रुवारी) पर्यावरणपूरक, स्वस्त आणि गारेगार प्रवास घडवणारी पहिली डबलडेकर इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस (Electric AC Double Decker Bus) सीएसएमटी आणि एनसीपीएदरम्यान धावणार आहे. त्यासाठी प्रवाशांना पहिल्या पाच किलोमीटरसाठी सहा रुपये मोजावे लागणार आहेत. बेस्टच्या (BEST) ताफ्यातील ही देशातील पहिली डबलडेकर एसी बस असून या महिन्याच्या अखेरीपर्यंत आणखी पाच डबलडेकर बस ताफ्यात सामील केल्या जाणार आहेत, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आली आहे.

इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस 13 फेब्रुवारीपासून मुंबईकरांच्या सेवेत

मुंबईकर नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण करणारी इलेक्ट्रिक डबल डेकर बस 13 फेब्रुवारीपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. बेस्टच्या कुलाबा आगारात पहिल्या ईव्ही डबल डेकरचं पूजन करण्यात आले आहे. या बसेस टप्प्याटप्प्याने बेस्टच्या सेवेत दाखल होणार आहेत. पहिली नवीन डबल डेकर बस मागील आठवड्यापासून वांद्रे कुर्ला संकुल ते वांद्रे स्टेशनपर्यंत धावण्यास सुरुवात झाली.

इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बसची वैशिष्ट्ये

प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन बसमध्ये विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. बसमध्ये सीट बेल्ट, स्पीकर या सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. संपूर्णपणे वातानुकूलित, ऐसपैस आसनव्यस्था, सीसीटीव्ही, तीन तासांच्या सिंगल चार्जमध्ये 120 किमी. प्रवासाची क्षमता ही या डबल डेकरची खास वैशिष्ट्ये आहेत. आसनक्षमतेबद्दल बोललो तर एका वेळी 65 लोक बसून प्रवास करु शकतात. तर 15 ते 20 लोक उभे राहून प्रवास करु शकतात. मार्च अखेरीस 50 डबल डेकर एसी इलेक्ट्रिक बस बेस्टकडून सेवेत दाखल होणार आहेत. एकूण 200 बसेस मुंबईकरांच्या सेवेत येणार आहेत.

नवीन इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बसचे फायदे
 
सध्या, बेस्टच्या ताफ्यात 45 नॉन-एसी डबल डेकर आहेत जे डिझेलवर चालतात आणि ते जूनच्या अखेरीस टप्प्याटप्प्याने बंद होतील. बेस्टकडून भाडेतत्त्वावर ई-डबल डेकर बस खरेदी केल्या जात आहेत. 2022 मध्ये एक बस सुरु करण्यात आली आणि मुंबईसाठी अशा एकूण 900 बसेस आणण्याची योजना आहे. पूर्वीच्या डबल डेकर बस नॉन-एसी होत्या. परंतु नवीन बस उत्तम एसी, सस्पेन्शनसह आरामदायी आणि आवाजविरहीत असतील. यामुळे बस स्टॉपवरील प्रतीक्षा वेळ कमी होईल आणि प्रत्येक ट्रिपमध्ये अधिकाधिक ऑफिस-जाणाऱ्यांची वाहतूक होईल, एका ई-डबल डेकर बसमध्ये 90 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. यातून प्रवास केल्यास रस्त्यावरील 20 खाजगी वाहनांची संख्या कमी होऊ शकते. असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget