एक्स्प्लोर
Advertisement
ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या एकाही महिलेला संधी नाही; 43 पैकी केवळ तीनच महिला मंत्री
महाराष्ट्र विकास आघाडीचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात एकून 36 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, यात केवळ तीनच महिलांना संधी देण्यात आली आहे.
मुंबई : ठाकरे सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. या मंत्रिमंडळात फक्त तीनच महिला नेत्यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात शिवसेनेच्या एकाही महिला नेत्याचा समावेश नाही. काँग्रेसने सर्वाधिक दोन महिलांना मंत्रिमंडळात संधी दिली आहे. तर, एका राष्ट्रवादीच्या महिला आमदाराचा समावेश आहे.
काँग्रेसकडून वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकूर यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आहे. तर राष्ट्रवादीच्या आमदार अदिती तटकरे यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अदिती तटकरे या सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून त्या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. यशोमती ठाकूर या काँग्रेसच्या विदर्भातील चेहरा आहे. आक्रमक नेत्या म्हणूनही त्यांची ओळख आहे. तर, वर्षा गायकवाड ह्या काँग्रेसच्या मुंबईतील महत्वाच्या आमदार मानल्या जातात.
काँग्रेसमध्ये सर्वाधिक महिला आमदार -
आज महाराष्ट्र विकास आघाडीचा शपथविधी सोहळा पार पडला. यात तीन महिलांना संधी देण्यात आली आहे. यात काँग्रेसच्या दोन महिला तर राष्ट्रवादीच्या एका महिला आमदाराला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. काँग्रेसकडून यशोमती ठाकून आणि वर्षा गायकवाड यांना कँबिनेट तर, राष्ट्रावादीकडून अदिती तटकरे यांनी राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. मंत्रिमंडळातील संख्या पाहता हे प्रमाण कमी असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये सर्वाधिक महिला आमदारांची सख्या काँग्रेसमध्ये आहे. काँग्रेसमध्ये 44 आमदारांपैकी पाच महिला आमदार आहेत. त्यापैकी त्यांनी दोन महिलांना संधी दिली. राष्ट्रावादीच्या 54 आमदारांपैकी दोन महिला आमदार आहेत. त्यापैकी राष्ट्रवादीने एका महिलेला राज्यमंत्रीपद दिले आहे. तर, शिवसेनेच्या 56 आमदारांपैकी 2 महिला आमदार आहेत. मात्र, शिवसेनेने एकाही महिलेचा समावेश मंत्रिमंडळात केला नाही.
महाराष्ट्र विकास आघाडीतील महिला आमदार -
भायखळा –यामिनी जाधव (शिवसेना)
चोपडा –लता सोनवणे (शिवसेना)
तासगाव-कवठेमहाकाळ - सुमनताई पाटील(राष्ट्रवादी)
श्रीवर्धन - अदिती तटकरे (राष्ट्रवादी)
अमरावती - सुलभा खोडके (काँग्रेस)
तिवसा - यशोमती ठाकूर (काँग्रेस)
वरोरा - प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)
धारावी - वर्षा गायकवाड (काँग्रेस)
सोलापूर शहर मध्य - प्रणिती शिंदे (काँग्रेस)
हेही वाचा - Cabinet Expansion | शपथविधी सोहळ्याला संजय राऊतांची दांडी, आमदार सुनील राऊत राजीनामा देण्याच्या तयारीत?
Jayant Patil | गृहखातं कोणाकडे जाणार हे मंत्रिमंडळ विस्तारानंतर कळेल : जयंत पाटील | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
भारत
Advertisement