(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ओमिक्रॉनचा धोका, मुंबईत अलर्ट; व्हायरसला रोखण्यासाठी महापालिका सज्ज
Omicron variant Mumbai on Alert : ओमिक्रॉन विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेता मुंबईत प्रशासनाने विविध पातळीवर तयारी सुरू केली आहे.
Omicron Variant Mumbai Preparation : कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग मुंबईत फैलावू नये, विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी स्ट्रॅटेजी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार काही नियम तयार करण्यात आल्या असून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
विमान प्रवासासाठी तिकिट बुक करताना विमान कंपन्याना हमी द्यावी लागणार आहे. त्याशिवाय, मागील 15 दिवसांच्या प्रवासाची माहिती विमान कंपन्यांनी ई-मेलद्वारे घ्यावी अशी प्रशासनाने सूचना केली आहे. मागील 15 दिवसांमध्ये आफ्रिकन देशांमध्ये प्रवास केल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तीला तातडीने सात दिवसांसाठी संस्थात्मक विलगीकरण केले जाणार आहे. विलगीकरणासाठी 2 स्टार, 3 स्टार, 5 स्टार हॉटेल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थात्मक विलगीकरणाच्या कालावधीनंतरही 14 दिवसांच्या होम क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. मुंबई महापालिकेचे रिचर्डसन अॅन्ड क्रुडास कोविड सेंटर हे आंतरराष्ट्रीय प्रवाशांकरता राखीव असणार आहे.
नव्या स्ट्रेनवर लक्ष, 50 हजार कोविड चाचणी
परदेश प्रवास करुन आलेल्या प्रत्येक पॉझिटीव्ह रुग्णाचे कस्तुरबा प्रयोगशाळेत जिनोम सिक्वेंसींग टेस्ट केली जाणार आहे. दररोज 50 हजार कोविड चाचणी केल्या जाणार आहेत. प्रत्येक कोविड केंद्राचे ऑडिट करण्यात येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून काही यंत्रणांचा वापर झाला नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणांची तपासणी करण्यात येणार आहे. ऑक्सिजन साठा, औषध पुरवठा यांचीही तपासणी करण्यात येणार आहे.
मास्क न वापरण्यांविरोधात कारवाई
संसर्गाची बाधा होऊ नये यासाठी मास्कचा वापर अधिक प्रभावीपणे करण्याची सूचना तज्ज्ञांनी दिली होती. त्यानंतर प्रशासनदेखील मास्क वापराबाबत आग्रही आहे. मास्कचा वापर न करणाऱ्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दिवसाला 25 हजार जणांवर कारवाई करण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे.
लसीकरण नसेल तर कारवाई
लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. ज्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाले नसतील अशा संस्थांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्याशिवाय, मुंबईतील सार्वजनिक शौचालये दिवसांतून 5 वेळा सॅनिटाइज केली जाणार आहेत. मुंबईतील वॉर्ड वॉर रुम पुन्हा कार्यरत करण्यात येणार आहे. प्रत्येक वॉर्ड रुममध्ये 10 रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Omicron Variant : राज्यात शाळा सुरू होणार का?; विद्यार्थ्यांसह शिक्षक पालकांमध्ये संभ्रम
कोरोनाच्या 'बोत्सवाना व्हेरिएंट'मुळे जगभरात खळबळ; जाणून घ्या विषाणूबाबत प्रमुख मुद्दे