एक्स्प्लोर
गिरगावमध्ये तीन मजली इमारत कोसळली

मुंबई: गिरगावमधील सीपी टँकजवळील वासुदेव इमारतीचा काही भाग कोसळून या खाली काही लोक आडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. गिरगावमधील सीपी टँकजवळील वासुदेव या तीन मजली इमारतीचा काही भाग रात्री ९च्या सुमारास कोसळल्याने इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. या इमारतीखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्य़ाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे.
आणखी वाचा























