एक्स्प्लोर
राज्यातही शेकडो नीरव मोदी, सर्वसामान्यांना कोट्यवधींचा गंडा
राज्यात 184 घोटाळेबाज सर्वसामान्यांना 19 हजार कोटींचा चुना लावून फरार झाले आहेत. यापैकी भाजप सरकारच्या काळात गेल्या तीन वर्षात तपास यंत्रणांना फक्त अडीच कोटींची वसुली करणं शक्य झालं आहे.
![राज्यातही शेकडो नीरव मोदी, सर्वसामान्यांना कोट्यवधींचा गंडा Not just Nirav Modi, 184 fraudsters absconding in state राज्यातही शेकडो नीरव मोदी, सर्वसामान्यांना कोट्यवधींचा गंडा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/02/15090240/Diamond-King-Nirav-Modi-PNB-Fraud.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : पंजाब नॅशनल बँकेला साडे अकरा हजार कोटींचा चुना लावून गेलेला नीरव मोदी सध्या चर्चेत आहे. असं असलं तरी राज्यात छोटे-मोठे अनेक नीरव मोदी आहेत, ज्यांनी बँकेला आणि सर्वसामान्यांना गंडा घातला आहे. राज्यात 184 घोटाळेबाज सर्वसामान्यांना 19 हजार कोटींचा चुना लावून फरार झाले आहेत. यापैकी भाजप सरकारच्या काळात गेल्या तीन वर्षात तपास यंत्रणांना फक्त अडीच कोटींची वसुली करणं शक्य झालं आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी आरटीआयमधून ही माहिती मिळवली.
आर्थिक गुन्हे शाखेमार्फत 50 लाखांहून अधिकचे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे तपासले जातात. यामध्ये विजय मल्ल्या आणि नीरव मोदींसारख्या हाय प्रोफाइल प्रकरणांचा समावेश असतो. मात्र अशी अनेक प्रकरणं आहेत ज्यामध्ये बिल्डर, व्यापारी किंवा पोंजी स्कीम चालवणारे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात गंडा घालून पसार होतात. अशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्यावर होणाऱ्या कारवाईचा वेग मात्र कासवगतीने सुरू असल्याचं यातून स्पष्ट होत आहे.
गेल्या तीन वर्षात नोंद झालेले गुन्हे
- 2015 साली 5 हजार 560 कोटींचे घोटाळे
- 2016 साली 4 हजार 273 कोटींचे घोटाळे
- 2017 साली 9 हजार 835 कोटींच्या घोटाळ्यांची नोंद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)