एक्स्प्लोर
कितीही विरोध झाला तरी शिवस्मारक कुणीही रोखू शकत नाही : मुख्यमंत्री
मुंबई : कितीही विरोध झाला, तरी शिवस्मारक कुणीही रोखू शकत नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अरबी समुद्रात होणाऱ्या शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आज मुंबईत भाजपनं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
“काही लोक टीका करतात. मात्र, आम्ही याची चिंता करत नाही. छत्रपतींच्या काळातही द्रोह करत होते. पण कितीही विरोध झाला, तरी स्मारक कोणीही रोखू शकत नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.”, असे मुख्यमंत्री म्हणाले. शिवाय, शिवस्मारकाच्या भूमीपूजनासाठी सर्वाना निमंत्रण आहे, उद्या सर्वानी यावं, भव्य सोहळा पाहावा, असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले.
गड-किल्ल्यांचं संवर्धन आमच्या सरकारने सुरु केले आहे. रायगड आणि शिवनेरीच्या संवर्धनाचं कामही सुरु झालं आहे, असे सांगायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत.
दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास चेंबूरच्या शिवाजी पुतळ्याला अभिवादन करुन 36 जिल्ह्यातून आलेल्या जल-माती कलशांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी राज्यभरातून आलेले शिवप्रेमी आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
लालबाग, परळ अशा मुख्य रस्त्यानं ही मिरवणूक आधी भाजप कार्यालयाकडून गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेनं रवाना झाली. गेटवे इथं झालेल्या कार्यक्रमात जल आणि मातीचे कलश मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आले.
या मिरवणुकीत भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विनोद तावडे, रावसाहेब दानवे, आशिष शेलार यांच्यासह इतर पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी साहसी खेळांची पथकं, ढोल-ताशांची पथकं, पोवाडा गायन असा भरगच्च कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला.
भगवे फेटे परिधान केलेले आणि भगवे झेंडे हातात घेतलेले बायकर्स या रॅलीचं मुख्य आकर्षण ठरले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement