एक्स्प्लोर
...आम्ही आणि मलिष्का बहीण भाव, नितेश राणेंचा पाठिंबा
'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय' असं म्हणत मुंबई महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढणाऱ्या आरजे मलिष्काच्या पाठिशी आता काँग्रेस आमदार नितेश राणे उभे राहिले आहेत.
मुंबई: 'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय' असं म्हणत मुंबई महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढणाऱ्या आरजे मलिष्काच्या पाठिशी आता काँग्रेस आमदार नितेश राणे उभे राहिले आहेत.
नितेश राणे यांनी ट्विट करुन मलिष्काला पाठिंबा दिला आहे.
"मलिष्का तू एकटी नाही. आम्ही आहोत तुझ्या बरोबर.. वाघोबा करतो म्याव म्याव.. आम्ही आणि मलिष्का बहीण भाव!!", असं ट्विट नितेश राणे यांनी केलं.
https://twitter.com/NiteshNRane/status/887554866075377664
मलिष्काचं ट्विट
मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी, आरजे मलिष्काच्या घरी धाड टाकून, डेंग्यूच्या अळ्या सापडल्याचा दावा केला. त्यामुळे महापालिकेने मलिष्काला नोटीसही पाठवली आहे.
या नोटीसनंतर मलिष्काने ट्विट करुन, आपल्याला पाठिंबा देणाऱ्या मुंबईकरांचं आभार मानलं आहे.
'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय' असं म्हणत मुंबई महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढल्यानंतर, आर जे मलिष्काने आणखी एक टोला लगावला आहे.
मलिष्काने ट्विट करुन, "मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. तुम्ही खूप चांगले आहात. मुंबई, तू बेस्ट आहेस. मला तुझ्यावर भरोसा आहे", असं म्हटलं आहे.
https://twitter.com/mymalishka/status/887505519090569218
आरजे मलिष्काच्या घरी डेंग्यूच्या अळ्या, बीएमसीकडून नोटीस
मुंबई मनपाने मंगळवारी मलिष्काच्या वांद्र्यातील पाली नाका इथल्या सनराईज इमारतीमधील घरात तपासणी केली. यावेळी घरातील शोभेच्या कुंडीखालील डिशमध्ये साठलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या आढळल्या. यानंतर महापालिकेने मलिष्काला नोटीस बजावली आहे. याप्रकरणी मलिष्कावर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केली आहे.रेड एफएमवर 500 कोटींचा दावा ठोकण्याची शिवसेनेची मागणी
‘मुंबई, तुझा बीएमसीवर भरोसा नाय काय’ या गाण्यामुळे चर्चेत आलेली आरजे मलिष्का हिच्यावर शिवसेना अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याच्या तयारीत आहे. मुंबई महापालिकेची बदनामी केल्याप्रकरणी 93.5 रेड एफएमवर 500 कोटींचा दावा ठोकण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली आहे. शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर आणि अमेय घोले यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त अजॉय मेहता यांची भेट घेऊन रेडिओ वाहिनीवर कायदेशीर कारवाई करुन अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची मागणी केली आहे. संबंधित बातम्या रेड एफएमवर 500 कोटींचा दावा ठोकण्याची शिवसेनेची मागणी मुंबईत पाऊसच जोरदार पडतो, पालिका काय करणार : उद्धव ठाकरे शिवसेनेकडून आरजे मलिश्कावर टीका करणारं गाणं मुंबई, तुला बीएमसीवर भरवसा नाय काय?, आर.जे. मलिश्काचं गाणंअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement