एक्स्प्लोर

Salim Fruit : सलीम फ्रुटला 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी, टेरर फंडिंग प्रकरणी न्यायालयाचा निर्णय 

NIA : सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रुट आणि रियाझ भाटी या दोघांना एनआयएने अटक केली असून त्यांच्यावर टेरर फंडिंगचा आरोप आहे. 

मुंबई: डी गॅंगशी संबंधित खंडणी प्रकरणी सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रुटला 15 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर इतर सहा आरोपींना 18 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रुट आणि रियाझ भाटी हे दोघेही टेरर फंडिंग प्रकरणात अटकेत आहेत. 

सलीम फ्रुट हा छोटा शकीलचा साडू आहे. तक्रारदाराला डी गॅंग आणि छोट्या शकीलच्या नावानं तो धमकी द्यायचा. तसेच तक्रारदाराची महागडी रेंज रोव्हर गाडी त्याने जबरदस्तीने ताब्यात घेतली होती. आरोपींनी जबरदस्तीनं 65 लाखांची रोख रक्कमही ताब्यात घेतली होती. 

या प्रकरणात हवालामार्गे पैसे बाहेर पाठवण्यात आल्याचा आरोप एनआयएने त्यांच्या आरोपपत्रात केला आहे. याप्रकरणी समीर खान, अजय गोसालिया, फिरोज चमडा, अमजद रेडकर आणि जावेद खान हे इतर पाच आरोपी आहेत. या सर्व आरोपींमध्ये नियमित संभाषण झाल्याचे पुरावे एनआयएच्या हाती आहेत. या आरोपींचा परदेशातही नियमित संवाद असल्याचे पुरावे आहेत. 

एनआयएने केलेल्या या आरोपात काहीही तथ्य नसून ही रचलेली कथा असल्याचं आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. सलीम फ्रुट आणि रियाझ भाटी यांना जबरदस्तीने या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. न्यायालयीन कोठडीत असलेल्या सलीम आणि रियाझ यांना या गुन्ह्यात पोलिसांनी अडकवल्याचा आरोप त्यांनी केला. 

मात्र सरकारी वकिलांचा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. या नव्या खंडणी गुन्ह्यातही सलीम फ्रुट आणि रियाझ भाटी आरोपी असल्याने त्यांच्या विरोधात संघटीत गुन्हेगारीचं कलम लावण्यात आलं आहे. 

कोण आहे सलीम फ्रुट?

सलीम फ्रूट हा छोटा शकीलचा साडू आहे. छोटा शकील त्याला आपल्या मुलाप्रमाणे वागवतो. छोटा शकीलच्या पत्नीच्या धाकट्या बहिणीशी सलीमचा विवाह झाला आहे. सलीमचे वडील उमर कुरेशी हे मुंबईतील नल बाजार परिसरात फळे विकायचे. त्यामुळे सलीमला सलीम फ्रूट म्हणून संबोधले जाते.

या टोळीत सामील होण्यापूर्वी सलीम दुबईला फळे निर्यात करायचा. दुबईमध्ये त्याचा एक आलिशान बंगला देखील आहे. सलीमविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, एनआयएने मुंबईतील माहीम भागातील सुहेल खंडवानी यांच्या घरावर छापा टाकला होता. खांडवानी हे मुंबईतील माहीम दर्गा आणि हाजियाली दर्ग्याचे विश्वस्त आहेत. घरावर छापा टाकल्यानंतर एनआयएचे अधिकारी त्यांना माहीम येथील त्यांच्या कार्यालयात घेऊन गेले आणि तेथेही त्यांची चौकशी करण्यात आली.

या प्रकरणात  NIA ने अब्दुल कय्युम नावाच्या व्यक्तीची देखील चौकशी करत आहे, जो 1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी होता. परंतु, नंतर खटल्याच्या वेळी पुराव्याअभावी विशेष टाडा न्यायालयाने सर्व आरोपातून त्याला निर्दोष मुक्त केले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय 
Maharashtra Live Blog Updates: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय 
Maharashtra Goverment On LPG Cylinder Shortage: सिलिंडर नेणाऱ्या वाहनांना पोलिसांनी सुरक्षा द्यावी, कंट्रोल रुम बनवा...; राज्य सरकारच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
सिलिंडर नेणाऱ्या वाहनांना पोलिसांनी सुरक्षा द्यावी, कंट्रोल रुम बनवा...; राज्य सरकारच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
Stuti Sonawane Death Case Mumbai: अलिबागची ट्रिप, आंबट कँडी आणि छोटा बाथटब...; आयुष्य संपवण्याआधी मुंबईकर स्तुती काय काय म्हणाली?
अलिबागची ट्रिप, आंबट कँडी आणि छोटा बाथटब...; आयुष्य संपवण्याआधी मुंबईकर स्तुती काय काय म्हणाली?
पायी परिक्रमा करत असलेल्या जैन मुनींचा अपघातात मृत्यू, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घडली घटना
पायी परिक्रमा करत असलेल्या जैन मुनींचा अपघातात मृत्यू, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घडली घटना

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock: 11 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 5 वर्षात 1200 रुपयांवर, एक लाखांचे बनले 1 कोटी, गुंतवणूकदार मालामाल  
11 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 5 वर्षात 1200 रुपयांवर, एक लाखांचे बनले 1 कोटी, गुंतवणूकदार मालामाल  
Period Leave : ... तर महिलांना कुणी नोकरी देणार नाही; पीरियड लीव्ह याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
... तर महिलांना कुणी नोकरी देणार नाही; पीरियड लीव्ह याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
US inquiry into India: पुन्हा टॅरिफ लादून दंडित करण्याची तयारी सुरु! आता अमेरिकेनं भारताची थेट चौकशी लावली; रशियन तेल खरेदीला 30 दिवसांची परवानगी दिल्यानंतर नवा आदेश
पुन्हा टॅरिफ लादून दंडित करण्याची तयारी सुरु! आता अमेरिकेनं भारताची थेट चौकशी लावली; रशियन तेल खरेदीला 30 दिवसांची परवानगी दिल्यानंतर नवा आदेश
Video: नवरा नवरी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; मांडवापासून ते भर रस्त्यावर नोटांचा खच पडला
Video: नवरा नवरी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; मांडवापासून ते भर रस्त्यावर नोटांचा खच पडला
India on US bombing of Iranian school: अमेरिकेनं 'टॉमहॉक' मिसाईल डागत 7 ते 12 वयोगटातील 165 हून अधिक चिमुरड्या शाळकरी मुली मारून टाकल्या; भारतानं पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली
अमेरिकेनं 'टॉमहॉक' मिसाईल डागत 7 ते 12 वयोगटातील 165 हून अधिक चिमुरड्या शाळकरी मुली मारून टाकल्या; भारतानं पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली
USS Abraham Lincoln: जगाला धडकी भरवणाऱ्या अमेरिकेच्या अब्राहम लिंकन अण्वस्त्रवाहू युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला? घरवापसी करत असल्याचा दावा, इराकमध्ये लष्करी विमान कोसळलं
जगाला धडकी भरवणाऱ्या अमेरिकेच्या अब्राहम लिंकन अण्वस्त्रवाहू युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला? घरवापसी करत असल्याचा दावा, इराकमध्ये लष्करी विमान कोसळलं
Donald Trump on Israel Iran War: इराणचे आज काय हाल होईल, फक्त बघा...; डोनाल्ड ट्रम्प यांची नवीन धमकी, आखाती देशात धडकी, नेमकं काय काय घडतंय?
इराणचे आज काय हाल होईल, फक्त बघा...; डोनाल्ड ट्रम्प यांची नवीन धमकी, आखाती देशात धडकी, नेमकं काय काय घडतंय?
अमेरिकेची आता सर्व देशांना रशियन तेल खरेदी करण्याची 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; चार वर्षात प्रथमच कच्च्या तेलाचा भाव 100 डॉलर्सच्या पार
अमेरिकेची आता सर्व देशांना रशियन तेल खरेदी करण्याची 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; चार वर्षात प्रथमच कच्च्या तेलाचा भाव 100 डॉलर्सच्या पार
Embed widget