एक्स्प्लोर
भावी मुख्यमंत्री शिवसेनेचाच, उद्धव ठाकरेंना विश्वास
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपला ठणकावलं आहे. “काही जण मुंबई महापालिका काबिज करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांचं हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही”, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे. तसंच भावी मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच होणार, असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी '50 वर्षांची घौडदौड' या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार, मंत्री, नेते उपस्थित होते.
दरम्यान, काल शिवसेना आमदारांच्या बैठकीतही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सत्तेबाबत नाराजी दर्शवली होती. सेना आमदारांच्या मतदारसंघातील कामं न झाल्यास, सत्तेतू पाठिंबा काढून घेऊ, असे संकेत उद्धव ठाकरेंनी काल शिवसेना आमदार आणि मंत्र्यांच्या बैठकीत दिल्याची सूत्रांनी माहिती दिली. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर कोणता मोठा निर्णय होतो का, याकडे सर्वांचीच नजर लागून राहिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement