एक्स्प्लोर
ठाणे आणि मुलुंडदरम्यान नवीन रेल्वे स्थानकाला मंजुरी
ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकाच्या दरम्यान नवीन रेल्वे स्थानक होणार असल्याची माहिती ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
![ठाणे आणि मुलुंडदरम्यान नवीन रेल्वे स्थानकाला मंजुरी New station on central railway between Thane and Mulund latest update ठाणे आणि मुलुंडदरम्यान नवीन रेल्वे स्थानकाला मंजुरी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2015/12/12173502/Local-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
प्रातिनिधिक फोटो
नागपूर : ठाणेकरांसाठी खुशखबर आहे. मध्य रेल्वेवरील नवीन स्थानकाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकाच्या दरम्यान नवीन रेल्वे स्थानक होणार असल्याची माहिती ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
कॅबिनेटच्या बैठकीत 290 कोटी रुपयांच्या तरतुदीला मान्यता मिळाली आहे. मुलुंडजवळ असलेल्या मनोरुग्णालयाची जागा या नवीन स्टेशनसाठी आरोग्य खात्याकडून देण्यात येणार आहे.
यापैकी 260 कोटी 'स्मार्ट सिटी'च्या निधीतून तर 30 कोटी रुपये ठाणे महापालिकेतून देण्यात येणार आहेत. त्या मोबदल्यात ठाणे महापालिकेकडून मनोरुग्णालयाच्या निर्मितीसाठी दुप्पट टीडीआर देण्यात येईल.
ठाणे रेल्वे स्थानक आणि परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून गेली अनेक वर्षे ठाणे आणि मुलुंड यांच्या दरम्यान विस्तारित ठाणे स्थानक बांधण्याची मागणी शिवसेना करत आहे. दीडशे वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या ठाणे स्थानकाची क्षमता संपली असून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असल्यामुळे दुर्घटना घडण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत होती.
शिवसेना आणि महापालिकेच्या पाठपुराव्यानंतर रेल्वेने हा प्रकल्प करण्यास मान्यता दिल्यानंतरही आरोग्य विभागाच्या मालकीची जागा न मिळाल्यामुळे हा प्रकल्प पुढे सरकला नव्हता
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
मुंबई
व्यापार-उद्योग
भविष्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)