एक्स्प्लोर

गाडी टोईंग करण्यापूर्वी भोंग्यावरुन सूचना, नवी नियमावली जारी

मालाडमध्ये झालेल्या टोईंगच्या वादानंतर वाहतूक विभागाचे सहआयुक्त अमितेश कुमार यांनी टोईंगबाबत नवी नियमावली जारी केली आहे. यात गाडी टोईंग करण्यापूर्वी जर गाडीचा मालक आल्यास आणि तिथून गाडी काढल्यास त्याला कोणत्याही दंडाविना सोडण्यात येईल. तसंच गाडी टो करण्यापूर्वी ध्वनीक्षेपकावरुन गाडी काढण्यासाठी एकदा सूचनाही देण्यात येणार आहे.

मुंबई : मालाडमध्ये झालेल्या टोईंगच्या वादानंतर वाहतूक विभागाचे सहआयुक्त अमितेश कुमार यांनी टोईंगबाबत नवी नियमावली जारी केली आहे. यात गाडी टोईंग करण्यापूर्वी जर गाडीचा मालक आल्यास आणि तिथून गाडी काढल्यास त्याला कोणत्याही दंडाविना सोडण्यात येईल. तसंच गाडी टो करण्यापूर्वी ध्वनीक्षेपकावरुन गाडी काढण्यासाठी एकदा सूचनाही देण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईसह अन्य शहरांमध्ये टोईंगवाल्यांच्या मुजोरीमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी मालाडमध्ये महिला असलेल्या कारचं टोईंग केल्यानं वाद निर्माण झाला होता. त्यानंतर टोईंगबाबत नवी नियमावली बनवण्यात आली आहे. नव्या नियमावलीप्रमाणे प्रत्येक टोईंगच्या गाडीसोबत पोलिस उपनिरिक्षक दर्जाचा अधिकारीही तैनात करण्यात येणार आहे. गाड्या टोईंग करण्याआधी आता पोलिसांना भोंग्यावरुन जाहीर करावं लागणार आहे. जर गाडी टोईंग करत असताना गाडीचा मालक आला तर ती गाडी सोडून देण्यात येईल असाही नवा नियम लागू करण्यात आला आहे. काय आहे नवी नियमावली : गाडी टो करण्यापूर्वी भोंग्यावरुन सूचना देण्यात येईल. टो करण्यापूर्वी चालक आल्यास गाडी सोडून देण्यात येईल. टोईंगच्या गाडीतील प्रत्येक अधिकाऱ्याकडे ई-चलन उपकरण आणि वॉकी-टॉकी देण्यात येईल. गाडी टो कऱण्यापूर्वी भोंग्यावरुन सूचना देणं बंधनकारक असेल. टो करण्यापूर्वी चालक येऊन गाडी घेऊन गेल्यास गाडी दंडाशिवाय सोडून देण्यात येईल. गाडी टो करताना चालक आल्यास फक्त दंड आकारता येईल, मात्र टोईंग चार्जेस आकारता येणार नाहीत. टो केल्यानंतर चालक आल्यास दंड आणि टोईंग चार्जेस आकारुन गाडी सोडून देण्यात येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget