एक्स्प्लोर
रोहित पवार यांचा फडणवीस यांना टोला, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी बॅटिंग
राज्यातील कोरोना परिस्थितीवरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. असे असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी धावून आलेत.
मुंबई : राज्यातील कोरोना परिस्थितीवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलाय. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरेंसाठी बॅटिंग केलीय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावत काही प्रतिप्रश्न विरोधकांना विचारले आहेत.
त्यांना राजकीय स्टेटमेंट करण्याची सवय - रोहित पवार
राज्यात कोरोना महामारीमुळे परिस्थिती वाईट असताना राज्य सरकार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात व्यस्त असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, की बदल्यांमध्ये आम्ही बिझी आहोत असे ते बोलतायत, मग आम्हीही म्हणतो की, राज्य अडचणीत असताना विरोधी पक्षनेते बिहार निवडणुकीत कसे काय लक्ष घालू शकतात? त्यांना राजकीय स्टेटमेंट करण्याची सवय आहे. कोल्हापुरात पूर असताना कर्नाटकची चूक झाली होती, तसं त्यांनी कबूल केलंय. आता पूर्व विदर्भातील पुराबाबत एमपी सरकारने विश्वासात घेतले नसल्याचे दिसतंय, असेही पवार म्हणाले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील आरेची 600 एकर जागा वनांसाठी राखीव
पंतप्रधान कुठं आहेत?
मुख्यमंत्री बाहेर नाहीत म्हणतायत मग पंतप्रधान कुठं आहेत? ते देखील ऑफिसमध्येच बसून काम करतायत ना? जीएसटीचा फंड मिळत नसतानाही राज्य सरकार चांगले काम करत असल्याचे म्हणत एकप्रकारे उद्धव ठाकरेंची पाठराखण केली आहे. पांडुरंग रायकर यांच्याबाबतीत जे झालं ते वाईट झालं, आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत. जे झालं ते चुकीचं झालं. यात शहानिशा करण्याची गरज आहे व त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदेश दिले असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली आहे.
Pravin Darekar | घरात बसणारे मुख्यमंत्री, प्रविण दरेकरांची उद्धव ठाकरेंवर टीका
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement