एक्स्प्लोर
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांचं निधन
वसंत डावखरे हे ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते होते. 1986 साली त्यांनी ठाणे महापालिकेतून नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये डावखरे यांनी अखेरचा श्वास घेतला.
वसंत डावखरे हे ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते होते. 1986 साली त्यांनी ठाणे महापालिकेतून नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. पुढे 1987 साली ते ठाण्याचे महापौरही झाले.
1992 पासून ते चारवेळा महाराष्ट्राच्या विधान परिषदेत आमदार म्हणून निवडून गेले.
सर्वच पक्षातील नेत्यांशी राजकारणाच्या पलिकडे त्यांचं सुसंवादाचं नातं होतं. त्यामुळे वसंत डावखरे यांच्या निधनाने राष्ट्रवादी पक्षात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली.
वसंत डावखरे यांचा अल्पपरिचय
वसंत डावखरे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. पुढे शिक्षणासाठीही त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. घरातूनच देशभक्तीचं बाळकडू मिळाल्याने अर्थात राजकारणाकडे ते वळले. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांचा राजकारणाशी संबंध आला.
हिवरे गावचे सरपंच ते विधान परिषदेचे उपसभापती हा त्यांचा राजकारणातील प्रवास प्रेरणादायी असा आहे.
1986 साली ठाणे महापालिकेची स्थापना झाली. त्यानंतर पहिल्याच निवडणुकीत ते नौपाड्यातून काँग्रेसचे नगरसेवक म्हणून विजयी झाले. 1986-1987 साली ते ठाणे महापालिकेत विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर ते ठाण्याचे महापौरही झाले.
1992 पासून सलग चारवेळा ते विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. 1998 मध्ये विधान परिषदेच्या उपसभापतीपदी त्यांची एकमताने निवड झाली. सलग 18 वर्षे ते उपसभापती होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
बातम्या
क्रीडा
Advertisement