ठाणे मनपाच्या मेडिकल टेंडरनंतर जितेंद्र आव्हाडांचे ट्विट, ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशनसह राष्ट्रवादी आक्रमक
ठाणे महानगर पालिकेच्या (Thane Municipal Corporation ) छत्रपती शिवाजीमहाराज रुग्णालयातील मेडिकल स्टोअर भाडेतत्वावर देण्यासाठीच्या निविदा वेलनेस किंवा नोबेल या औषध विक्रेत्यांना फायदेशीर ठरण्याच्या उद्देशानेच काढण्यात आल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
Jitendra Awhad : ठाणे महानगर पालिकेचे (Thane Municipal Corporation ) छत्रपती शिवाजीमहाराज रूग्णालय नेहमीच गैरकारभारमुळे चर्चेत असते. आता या रुग्णालयातील मेडिकल स्टोअर भाडेतत्वावर देण्यासाठीच्या निविदा या वेलनेस किंवा नोबेल या औषध विक्रेत्यांना फायदेशीर ठरण्याच्या उद्देशानेच काढण्यात आल्या असल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. काल त्यांनी याबाबत ट्विट करून नाराजी व्यक्त केली होती. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये महापालिकेच्या एका अधिकार्याचे नाव देखील घेतले होते. त्यानंतर आज कळवा ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशन आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे टेंडर पुन्हा काढावे अशी मागणी केली आहे.
आता काय औषधाच्या गोळ्या उंदरांसाठी वापरणार आहात का? भ्रष्टाचार कुठे करायचा याच तरी भान ठेवा. मनिष जोशी या कलाकाराला सलाम.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 31, 2022
हि तक्रार मेडिकल दुकानदारांच्या संघटनेने माझ्या कडे केली आहे
ठाणे महानर पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मेडिकल भाडेतत्वावर देण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. निविदा काढल्यापासून त्या सादर करण्यासाठी अवघ्या आठ दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. तसेच हे टेंडर मिळण्यासाठी 30 मेडिकल शॉप्स असणे, वर्षाची आर्थिक उलाढाल 120 कोटींच्या घरात असणे, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. या अटी सामान्य औषध विक्रेत्यांना सहज साध्य होणाऱ्या नाहीत, असा आरोप असोसिएनकडून करण्यात आला आहे.
कोणाला घालता येतो का बघायला. घेणारा माणूस एकच असतो ज्याच्या मापाने शर्ट शिवलेला असतो. हॉस्पिटलमध्ये गँगरीनचे ऑपेरेशन होतं नाही, तिथे महिलांना सुविधा उपलब्ध नाहीत, हॉस्पिटलमध्ये पाणी उपलब्ध नाही, डॉक्टर जागेवर नाहीत. प्रसूती केंद्र बंद आहेत.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 31, 2022
पालिकेने घातलेल्या या अटींच्या माध्यमातून बड्या भांडवलदारांनाच औषधे विक्री करण्याचा परवाना देण्यात येणार आहे. यावरून गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी रात्री ट्वीट करून ठाणे महानगर पालिका प्रशासनावर टीकास्त्र सोडले होते. आज आनंद परांजपे यांनी या प्रकरणी पालिका आयुक्त विपीन शर्मा यांना निवेदन देऊन निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे. या विरोधात कळवा केमिस्ट अँड ड्रॅगिस्ट असोसिएशनने देखील आपला विरोध दर्शवला आहे.
महत्वाच्या बातम्या
Mumbai Mega Block: रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक
Mumbai Metro : मेट्रोच्या उद्धाटनाच्या आधी शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई; देवेंद्र फडणवीसांना निमंत्रणच नाही
Sanjay Raut : भाजपकडून महाराष्ट्रात अतिरेक्यांसारखी कारवाया; संजय राऊत यांचा हल्लाबोल