Cruise Drugs Party : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी येत्या काळात अनेकांना अटक होणार; NCB च्या प्रमुखांची माहिती
Cruise Drugs Party : गेल्या काही दिवसांपासून एनसीबीला मुंबईत पसरणाऱ्या ड्रग्जच्या नेटवर्कबद्दल माहिती मिळत होती. त्याआधारे ही कारवाई करण्यात आल्याचं एनसीबीचे प्रमुख एसएन प्रधान यांनी सांगितलं.
![Cruise Drugs Party : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी येत्या काळात अनेकांना अटक होणार; NCB च्या प्रमुखांची माहिती NCB Head clears Many will be arrested in the coming days in the Cruise Drug Party case Cruise Drugs Party : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी येत्या काळात अनेकांना अटक होणार; NCB च्या प्रमुखांची माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/03/deac941538068656ad51c8a225e331d4_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : एनसीबीनं (NCB) काल रात्री मुंबईतील एका क्रूझवर सुरु असलेल्या ड्रग्ज पार्टीवर छापा मारला. या प्रकरणी आठ लोकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून एनसीबीला मुंबईत पसरणाऱ्या ड्रग्जच्या नेटवर्कबद्दल माहिती मिळत होती. त्याच्या आधारे कालची कारवाई करण्यात आल्याचं एनसीबीचे प्रमुख एसएन प्रधान यांनी सांगितलं. या प्रकरणाची एनसीबीकडून अधिक तपास करण्यात येणार असून येत्या काळात अनेक जणांना अटक होण्याची शक्यता आहे असं एसएन प्रधान म्हणाले.
कालची कारवाई ही एनसीबीच्या 22 जणांच्या एका टीमने केली आहे. ज्यावेळी त्या क्रूझवर पार्टी सुरु झाली त्यावेळी एनसीबी त्या ठिकाणी पोहोचली. या ठिकाणी ड्रग्ज कसं पोहोचलं हा तपासाचा विषय असून यामागे निश्चितपणे एक मोठं नेटवर्क आहे असं एनसीबीचे प्रमुख एसएन प्रधान यांनी सांगितलं. पूर्ण सत्यता पडताळणी केल्यानंतरच एनसीबीने या प्रकरणातील आरोपींची नावं माध्यमांसमोर जाहीर केली आहे असंही ते म्हणाले.
एनसीबीनं काल रात्री मुंबईतील एका क्रूझवर सुरु असलेल्या ड्रग्ज पार्टीवर छापा मारला. या प्रकरणी आठ लोकांना अटक करण्यात आली आहे. क्रूझवर ड्रग्ज पार्टी सुरू असताना शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान क्रुझवर उपस्थित होता. त्यामुळे त्याची चौकशी सुरु आहे. आर्यन खान समवेत त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा, नुपूर सारिका, इश्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा यांचीही चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. काल रात्री एनसीबीने या क्रुझवर केलेल्या कारवाईत 30 ग्रॅम चरस, 20 ग्रॅम कोकेन, 20 ग्रॅम टॅबलेट्स, 10 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)