एक्स्प्लोर

भिवंडीत 864 किलो कोडीन आधारित कफ सिरप जप्त, NCB ची कारवाई

जप्त करण्यात आलेल्या या कफ सिरपच्या बाटल्या मुंबई आणि ठाण्यातील विविध भागांमध्ये नशेच्या उद्देशाने पुरवण्यात येत होत्या.

मुंबई: नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने ( NCB) केलेल्या छापेमारीत अवैधपणे विक्रीस नेण्यात येणाऱ्या कोडीन आधारित कफ सिरपचा साठा पकडण्यात आला. दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून 864 किलो (8640 बाटल्या) कोडीन आधारित कफ सिरप जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या या बाटल्यांची किंमत अंदाजे 35 लाख रुपये इतकी आहे. NCB ने अंमली पदार्थ पुरवठादार आणि पेडलर्स विरुद्ध सतत लढा देत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे कारवाई केली. या कारवाईमध्ये एनसीबीने एक बोलेरो पिकअप आणि एका दुचाकीसह कफ सिरप जप्त केले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, NCB मुंबईच्या एका पथकाने भिवंडीजवळ आग्रा-मुंबई महामार्गावर पाळत ठेवली आणि एक बोलेरो पिकअप अडवली. वाहनाची झडती घेतली असता त्या वाहनात 60 बॉक्समध्ये एकूण 864 किलो (8640 बाटल्या) कोडीन आधारित कफ सिरप पद्धतशीरपणे भरलेले आढळले. एनसीबीने हे सर्व जप्त केलं. जप्त केलेल्या औषधांची वाहतूक करणाऱ्याला तत्काळ ताब्यात घेण्यात आले.

एनसीबीने वाहकाची अधिक चौकशी केली असता मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन तासांनंतर रीसीव्हरला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. सुमारे दोन किमी पायी पाठलाग केल्यानंतर त्याला पकडण्यात आले.

मिळालेल्या माहितीच्या आधारे या बाटल्या मुंबई आणि ठाण्यातील विविध भागांमध्ये नशेच्या उद्देशाने पुरवण्यात येत होत्या. एनसीबी मुंबईने या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू असल्याचे अमित घावटे, आयआरएस, झोनल डायरेक्टर, एनसीबी, मुंबई यांनी सांगितले, अमित घावटे यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन राबवण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget