एक्स्प्लोर
माझी सहनशीलता संपण्याच्या आत निर्णय घ्या : राणे
'मी या विषयावर मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. माझी सहनशीलता संपण्याच्या आत निर्णय घ्या. असं मी त्यांना सांगणार आहे.'
मुंबई : 'माझी सहनशीलता संपण्याच्या आत निर्णय घ्या. असं मी त्यांना सांगणार आहे.' अशा शब्दात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम दिलं आहे.
राणेंना मंत्रीपद मिळणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र, अद्यापही राणे मंत्रीपदापासून दूरच आहेत. त्यामुळे याचविषयी बोलताना आज (शुक्रवार) राणे उद्विग्न झाल्याचे पाहायला मिळालं.
आज नारायण राणेंनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना मंत्रीपदाबाबत प्रश्नही विचारण्यात आला. त्यावेळी बोलताना राणे म्हणाले की, 'मी या विषयावर मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. माझी सहनशीलता संपण्याच्या आत निर्णय घ्या. असं मी त्यांना सांगणार आहे.' असं राणे यावेळी म्हणाले.
दरम्यान, आता राणेंच्या या पवित्र्यानंतर भाजप आणि मुख्यमंत्री फडणवीस नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
VIDEO :
संबंधित बातम्या :
कोकण भस्मसात करण्याचा सेनेचा डाव : नारायण राणे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement