एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
व्हॉट्सअॅप ग्रुपवरुन वाद, नालासोपाऱ्यात भाजप कार्यकर्ते आमने-सामने

नालासोपारा: व्हॉट्सअॅप ग्रुपवरुन वाद उद्भवण्याचे प्रकार सर्रास घडत असतात. मात्र नालासोपाऱ्यात भाजप कार्यकर्त्यांमधला हा वाद हाणामारी करण्यापर्यंत गेला आहे. भाजप युवा अध्यक्ष बीजेंद्र कुमार आणि एका महिला कार्यकर्तीमधला वाद विकोपाला गेला आहे.
भाजप नालासोपारा या व्हॉट्सअॅप ग्रुप वर बीजेंद्र कुमार आणि इतर भाजप कार्यकर्ते आहेत. त्यामध्ये प्रतिभा पाध्ये नावाची कार्यकर्ती नव्यानं अॅड झाली. बीजेंद्र आणि प्रतिभा यांच्यामधील मतभेद पक्षाच्या व्हॉट्स अप ग्रुपवर उतरले आणि शाब्दिक वाद विकोपाला गेला. ग्रुपवरचं मारामारीच्या मेसेज पोस्ट केले. त्यानंतर संतप्त प्रतिभा पाध्ये यांनी आपल्या कार्य़कर्त्यांसह बीजेंद्रकुमारला मारहाण करण्यास वसंत नगरीत आल्या.
प्रसंगावधान राखून बीजेंद्रकुमारनं त्याठिकाणाहून पळ काढला. ही सगळी दृश्यं सीसीटीव्हीत कैद झाली असून. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. मात्र कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास तयार नाही.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























