एक्स्प्लोर
नालासोपारा स्फोटकप्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ
नालासोपारा स्फोटकांप्रकरणी अटकेल असलेल्या आरोपींच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. शरद कळसकरला सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे, तर वैभव राऊत आणि सुधन्वा गोंधळेकर या दोघांनाही 15 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबई | नालासोपारा स्फोटकांप्रकरणी अटकेल असलेल्या आरोपींच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. शरद कळसकरला सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे, तर वैभव राऊत आणि सुधन्वा गोंधळेकर या दोघांनाही 15 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
जालन्यातून अटक करण्यात आलेल्या श्रीकांत पांगरकरला 6 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणाच्या चौकशीसाठी शरद कळसकरला मुंबई सत्र न्यायालयाने सीबीआयच्या ताब्यात सोपवलं आहे.
नालासोपारा शस्रसाठा प्रकरणी अटकेत असलेल्या अविनाश पवारची पोलिस कोठडी मुंबई सत्र न्यायालयाने 4 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. मात्र शुक्रवारच्या सुनावणीत कोर्टाने एटीएसची चांगलीच कानउघाडणी केली. अविनाश पवारला अटक केल्यानंतर तुम्ही सहा दिवस केलंत तरी काय? असा सवाल एटीएसला न्यायाधीश विनोद पाडळकर यांनी विचारला.
एटीएसने आरोपींच्या टार्गेटवर कोण होतं, त्यांची नावं उघड न करण्याची विनंती केली होती. नावं उघड झाल्यास तपासावर त्याचा परिणाम होईल, असं एटीएसचं म्हणणं होतं. मात्र कोण टार्गेट होतं आणि कोणाची रेकी करण्यात आली, याचा उल्लेख ऑर्डर कॉपीत करणं आवश्यक असल्याचं म्हणत कोर्टाने एटीएसची विनंती फेटाळून लावली.
नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयात धक्कादायक खुलासा केला. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या कन्या मुक्ता दाभोळकर, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्यरत असलेले प्राध्यापक श्याम मानव, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील नेते जितेंद्र आव्हाड आणि रितूराज नावाची व्यक्ती हे चार जण नालासोपारा प्रकरणात अटक केलेल्या आरोपींच्या रडारवर होते, अशी माहिती महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने कोर्टात दाखल केलेल्या केस डायरीतून पुढे आली. या चौघांचीही रेकी करण्यात आली होती, अशी माहिती आरोपींच्या चौकशीतून समोर आल्याचं एटीएसनं म्हटलं आहे.
विशेष म्हणजे केस डायरीत हा कागद आधी नव्हता मग तो यावेळी कुठून आला? असा सवालही कोर्टाने एटीएसला विचारला, त्यावर एटीएसने गेल्या वेळीदेखील हा कागद होता असा दावा केला, पण "मी ही सगळी केस नीट वाचून आलोय, गेल्यावेळी हा कागद नव्हता" अशा शब्दात न्यायाधीशांनी एटीएसला खडसावलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
भविष्य
क्राईम
Advertisement