एक्स्प्लोर
नालासोपाऱ्यात चार रुपयांसाठी चाकूने भोसकून हत्या
ही घटना जवळच्या पालिका परिवहन कार्यालयाच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
नालासोपारा : नालासोपाऱ्यात केवळ 4 रुपयांसाठी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. अंडा पाव खाताना 4 रुपये कमी दिल्याच्या कारणावरून, कांदा कापण्याचा चाकू पोटात मारून गंभीर जखमी केलं होतं. उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला.
केवळ चार रुपयांसाठी जीव घेतला
कांदिवलीच्या जनशताब्दी रुग्णालयात उपचारा दरम्यान जखमीचा मृत्यू झाला. ही घटना जवळच्या पालिका परिवहन कार्यालयाच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. नालासोपारा पूर्व रेल्वे पुलाखाली शुक्रवारी मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास ही घटना घडली होती.
गोरखनाथ उर्फ रवी भागवत असं मृत्यू झालेल्या 40 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. रवी भागवत हे कचरा वेचण्याचं काम करत होते. रवी भागवत यांनी 12 रुपये प्रमाणे दोन अंडापाव घेतले. त्यात त्यांनी 24 रुपयांऐवजी 20 रुपये दिले होते. 4 रुपयांवरून अंडा विक्रेता, त्याचे साथीदार आणि रवी भागवत यांच्यात वादावादी झाली.
दोन जण ताब्यात, एक जण फरार
रागाच्या भरात चक्क कांदा कापण्याचा चाकूने पोटात वार करण्यात आले. रवी भागवत हे यावेळी गंभीर जखमी झाले. या प्रकरणी 3 जणांवर तुलिंज पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून 2 जणांना ताब्यात घेतलं आहे. तर एक जण फरार आहे.
तक्रार नोंदवण्यास हयगय करणारे पोलीस निलंबित
दरम्यान याप्रकरणी तक्रार नोंदवण्यास हयगय केल्याप्रकरणी त्यावेळी कामावर असणारे पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस हवालदार यांच्यावर पालघर पोलीस अधीक्षकांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement