Mumbai Local News : लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी बातमी! पश्चिम रेल्वे लोकलमध्ये आणखी 25 जागा निश्चित
Mumbai Local News : मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.
Mumbai Local News : मुंबईच्या (Mumbai) लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पश्चिम रेल्वेने (Western Railway) आपल्या सर्व नॉन-एसी नियमित लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांसाठी अधिक जागा उपलब्ध करण्यात येणार आहेत. सध्याचे जनरल कंपार्टमेंट अपग्रेड केले जाईल. सध्या मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिला वर्गासाठी आणखी 25 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. 8 ऑक्टोबर 2022 पासून ही सुविधा लागू करण्यात आली आहे.
महिला प्रवाशांची मागणी
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर म्हणाले, “महिला प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन आम्ही एकूण एक अतिरिक्त महिला कोचची तरतूद केली आहे. याशिवाय या डब्यात एका महिला द्वितीय श्रेणीच्या आणखी 25 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. हा कोच सध्याच्या लेडीज कोचला लागून आहे, ते म्हणाले की ही सुविधा 8 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेने उपनगरीय लोकल गाड्यांच्या द्वितीय श्रेणीतील महिलांसाठी 25 अतिरिक्त आसनांची तरतूद केली आहे.
महिला प्रवाशांची संख्या वाढली
उपलब्ध आकडेवारीनुसार, पश्चिम रेल्वेवर महिला प्रवाशांची संख्या 24.38% वरून 24.64% झाली आहे. 2019 मध्ये, पश्चिम रेल्वेने बदलत्या काळाच्या अनुषंगाने आपले महिला डबे अपडेट केले. पश्चिम रेल्वेने महिला डब्यांना लक्षात घेऊन त्यांचे आधुनिकीकरण केले होते.
जागेवरून महिलांमध्ये भांडण
लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या जागा वाढवण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू होती. त्याचवेळी, या महिन्याच्या सुरुवातीला लोकल ट्रेनमध्ये सीटवरून काही महिला एकमेकांशी भिडल्या. त्यांच्यातील भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे समोर आले होते. ठाणे-पनवेल मुंबई लोकलच्या महिला कोचमध्ये ही घटना घडली.
रेल्वेमध्ये कोरोनापूर्वी प्रमाणेच गर्दी
सद्यस्थितीत रेल्वेमध्ये कोरोनापूर्वीप्रमाणेच गर्दी होऊ लागली आहे. याच गर्दीचा फायदा घेत फलाट, पादचारी पूल आणि लोकल गाड्यांमध्ये चोरीचे प्रमाण वाढल्याचे समजते. चोरांनी प्रवाशांचे मोबाईल, पाकिट, सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू असलेल्या बॅगांवर डल्ला मारण्यास सुरुवात केली. तर गर्दी नसलेल्या ठिकामी महिलांची छेडछाड, विनयंभगाबरोबरच चोरीच्या उद्देशाने मारहाणीच्याही घटना घडू लागल्या आहेत.
हेही वाचा
Uddhav Thackeray vs Samta Party : मशाल चिन्ह कुणाचं? शिवसेना की समता पक्ष? ठाकरेंच्या अडचणी वाढणार?
Shivsena : अंधेरी पूर्व विधानसभेसाठी शिवसेनेचं ठरलं; ऋतुजा लटके देणार शिंदे- भाजपला लढत